Swiggy वर लोक सर्वाधिक हा पदार्थ करतात ऑर्डर

Swiggy वर लोक सर्वाधिक हा पदार्थ करतात ऑर्डर

विशेष म्हणजे Swiggy ने जी आकडेवारी दिली त्यात स्पष्ट झालं की लोक मांसाहारी ऑर्डरपेक्षा शाकाहारी ऑर्डर जास्त प्रमाणात देतात.

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट- हल्ली प्रत्येकालाच आपलं आवडतं जेवण ऑनलाइन मागवणं सोपं झालं आहे. यासाठी फार काही करावंही लागत नाही. फूड डिलीव्हरी अप उघडून तुम्हाला जे खाणं हवं ते तुम्ही मागवू शकता. असं म्हटलं जातं की, ऑनलाइन जे फूड मागवलं जात त्यात सर्वाधिक फास्ट फूड ऑर्डर करतात. मात्र Swiggy चे आकडे काही वेगळंच सांगत आहेत.

Swiggy ने या आठवड्यात पाच वर्ष पूर्ण केली. Swiggy ने 2014 मध्ये सुरुवात केली होती. गेल्या पाच वर्षांत ही कंपनी 290 शहरांमध्ये पोहोचली. या फूड डिलीव्हरी कंपनीने आपला पाच वर्षांचा अनुभव आणि आकड्यांच्या आधारे सर्वात जास्त ऑर्डर या पिज्झा किंवा बर्गरच्या आल्या नसून बिर्याणीच्या आल्या असल्याचं म्हटलं. Swiggy ने सांगितलं की, 43 ऑर्डरमध्ये एक ऑर्डर ही बिर्याणीची असते. यानंतर डोसा आणि बर्गरचा नंबर येतो.

कुछ मीठा हो जाए-

गोड पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर लोकांची पहिली पसंत गुलाबजाम आहेत. यानंतर रसमलाईचा नंबर येतो. Swiggy ने हेही सांगितलं की, खाण्यासोबतच लोक कॉफीही मोठ्या प्रमाणात ऑर्डर करतात. विशेष म्हणजे Swiggy ने जी आकडेवारी दिली त्यात स्पष्ट झालं की लोक मांसाहारी ऑर्डरपेक्षा शाकाहारी ऑर्डर जास्त प्रमाणात देतात. मोठ्या शहरांमध्ये मांसाहार पदार्थांची ऑर्डर मोठ्या प्रमाणात येते. यासोबतच Swiggy ने त्यांचा सर्वात निष्ठावंत ग्राहक कोण आहे याचाही खुलासा केला. बंगळुरूच्या एका व्यक्तिने आतापर्यंत 17,962 ऑर्डर केल्या आहेत.

आता सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार अतिरिक्त 6 सुट्ट्या

यामुळे आजही देशात इतर राज्यांपेक्षा जम्मू- काश्मीर आहे सर्वोत्तम

कमी खर्चात अशा प्रकारे सजवू शकता तुमचं स्वप्नातलं घर 

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या