Grofer आणि Big Basket ला टक्कर द्यायला 'ही' कंपनी सज्ज; फळं, भाज्या मिळणार घरपोच

बऱ्याचदा Grofers किंवा Big Basket मधून भाज्या, धान्य मागवलं जातं. पण आता या कंपन्यांना स्पर्धा द्यायला एक नवी कंपनी तयार झालीय.

News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2019 12:03 PM IST

Grofer आणि Big Basket ला टक्कर द्यायला 'ही' कंपनी सज्ज; फळं, भाज्या मिळणार घरपोच

मुंबई, 13 फेब्रुवारी : धावपळीच्या काळात बाजारात जाऊन भाजी विकत घ्यायला कोणाला वेळ नसतो. बऱ्याचदा Grofers किंवा Big Basket मधून भाज्या, धान्य मागवलं जातं. पण आता या कंपन्यांना स्पर्धा द्यायला एक नवी कंपनी तयार झालीय.

स्विगीनं आता स्विगी स्टोअर्सची सुरुवात केलीय. रोजच्या लागणाऱ्या गोष्टी ही कंपनी घरपोच करणार आहे. स्विगीनं सांगितलंय, भाज्या, फळं , किराणा माल, सुपर मार्केट, फुलं, लहान मुलांच्या गोष्टी, आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्व काही स्विगीकडे मिळतंय.

आतपर्यंत स्विगी खाण्याचे पदार्थ आणि अनेक प्रकारच्या वस्तू घरपोच देत होती. ती सेवा तशीच सुरू राहणार. पण याशिवाय आता भाज्या, किराणामालमध्ये या कंपनीनं उडी मारलीय.

कंपनीचे मुख्य अधिकारी श्रीहर्ष मजेती म्हणाले, स्विगी अन्नपदार्थ घरी डिलिव्हर करत होतीच. आता आम्ही आमचा व्यवसाय वाढवायचा ठरवलाय. ग्राहकांना आता जास्त सुविधा मिळतील.

आज ( 13 फेब्रुवारी ) मात्र स्विगी वादात सापडलीय. चेन्नईतील एका ग्राहकानं स्विगी या वेबसाईटवरून जेवण मागवलं. अर्ध जेवण संपवल्यावर त्या जेवणात चक्क रक्त लागलेलं बॅण्डेज असल्याचं त्या ग्राहकाला कळालं. बालामुरुगन दीनदयालन असं जेवण मागवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर बालामुरुगन यांनी याबाबत रेस्टॉरंटकडे तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

Loading...

'मी स्विगीवरून मागवलेल्या जेवणात रक्त लागलेलं बॅण्डेज सापडलं आहे. मी रेस्टॉरंटला याबाबत माहिती दिली पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना कॉल करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि चॅटवर याबाबत त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही,' अशी फेसबुक पोस्ट बालामुरुगन यांनी लिहिलेली आहे.

या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर अखेर स्विगीने याबाबत माफी मागितली आहे. पण असं असलं तरीही संबंधित ग्राहकाने स्विगी आणि रेस्टॉरंटवर खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.


#FitnessFunda : ...म्हणून बाॅलिवूडची बेबो दिसते हाॅट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 12:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...