कोरोना विषाणूमुळे मेंदूला येऊ शकते सूज; लंडन युनिव्हर्सिटीचं नवं संशोधन

कोरोना विषाणूमुळे मेंदूला येऊ शकते सूज; लंडन युनिव्हर्सिटीचं नवं संशोधन

संशोधनात असंही आढळलं की, Coronavirus चा संसर्ग झाल्यावर ज्या रुगांना कुठलीही लक्षणं दिसत नाहीत त्यांनाही मेंदूच्या समस्या होऊ शकतात.

  • Last Updated: Aug 4, 2020 11:37 AM IST
  • Share this:

लॉकडाउन उठल्यानंतर जगात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. पण एका संशोधनात असेही निदर्शनास आले आहे कि कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या मेंदूला सूज येते आहे. कोरोनासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्याच्या कामी लागले आहेत. या संबंधी अनेक शोध रोज प्रकाशित होत आहेत, त्यात या विषाणूची प्रकृती आणि प्रवृत्ती या विषयी नवनवीन माहिती समोर येते आहे.

myupchar.com चे AIIMS शी संबंधित डॉ. अजय मोहन यांच्यानुसार, साधारणपणे कोरोना संक्रमणात सर्दी आणि तापाची लक्षणे दिसतात.

यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या अहवालातील खुलासा

काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूंमुळे मेंदूच्या समस्या निर्माण होऊ शकतात असा दावा केला होता. तसेच आत समोर आले आहे की या विषाणूमुळे मेंदूच्या विशिष्ट भागावर सूज येऊ शकते, जो मेंदूच्या कार्यक्षमता प्रभावित करतो. हे संशोधन रिसर्च युनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिवर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल यांनी दोघांनी मिळून केले आहे. इथे शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या मेंदूशी निगडित लक्षणांची तपासणी केली. त्यांचे निष्कर्ष त्यांनी 'ब्रेन' नावाच्या जर्नल मधे प्रकाशित केले आहेत.

कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत त्यांनाही धोका

त्यांच्या शोधात असे दिसून आले की कोरोन संसर्गामुळे सूज येणाऱ्या आजारांचे प्रमाण वेगाने वाढते आहे. विशेषतः कोरोन संक्रमणानंतर अशा प्रकारचे रुग्ण वाढू लागले आहेत. संशोधकांनी त्यांना कोरोनामुळे होणाऱ्या धोक्यांमध्ये सामील केले आहे. त्यांच्या संशोधनात असेही आढळले की ज्या रुगांना कुठलीही लक्षणे दिसत नाहीत त्यांनाही मेंदूच्या समस्या होऊ शकतात. या अभ्यासात डॉक्टरांना सूज आणि डेलीरियम (मानसिक क्षमतांमधील गंभीर समस्या) पण पाहायला मिळाल्या.

मेंदूवर सूज येण्याची शक्यता जास्त

अहवालातील माहितीनुसार अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना मेंदूच्या समस्या आणि सूज दिसून आली. ज्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते आणि जे संक्रमित आहेत त्यांच्या मेंदूवर याचा परिणाम दिसून आला. त्यात सूज येण्याची शक्यता जास्त दिसून आली.

मेंदूच्या पेशींचा अभ्यास सखोलतेने केला गेला

संशोधकांच्या समूहाला असे अनेक रुग्ण पाहायला मिळाले, ज्यांच्यात डेलीरियम, ब्रेन डॅमेज , नर्व डॅमेज, ब्रेन इन्फ्लेमेशन आणि स्ट्रोकच्या समस्या होत्या. हे संशोधन अजून सुरु असून कोरोन विषाणू मेंदूच्या समस्या किती वेगाने आणि किती वाईट प्रभाव टाकतोय याचा अभ्यास केला जातोय.

myupchar.com चे AIIMS शी संबंधित डॉ. नबी वली यांच्यानुसार, डोकेदुखी, ताप, सांधे आणि स्नायू दुखणे, थकवा, कमजोरी, मेंदूला सूज ही सारी लक्षणे आहेत. कोरोन संक्रमणाच्या काळात मेंदूशी संबंधित काही समस्या दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मेंदू आणि चेतासंस्थेशी संबंधित आजार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 4, 2020, 11:37 AM IST

ताज्या बातम्या