• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मोसंबी रस; अनेक समस्यांपासून देईल आराम

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मोसंबी रस; अनेक समस्यांपासून देईल आराम

मोसंबीच्या रसात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी लोक मोसंबीचा रस पिणे पसंत करतात. मोसंबीमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. सी जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अनेक लोक आजारातून बरं झाल्यानंतर अशक्तपणा दूर व्हावा म्हणून मोसंबीचा रस पितात. याचे कारण म्हणजे मोसंबीच्या रसात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे आजारपणानंतर शरीराला मजबूत बनवतात. मोसंबी फक्त शक्तीच वाढवत नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊ मोसंबीच्या फायद्यांबाबत. वजन कमी करण्यात मदत करते myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, मोसंबीचा रस रिकाम्या पोटी घेतला तर वजन कमी होते. मोसंबीच्या रसात सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्याने चरबीचे ऑक्सिडेशन होते आणि त्यामुळे वजन कमी होते. त्याशिवाय शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकते. बद्धकोष्ठता दूर होते ज्या लोकांना बद्धकोष्ठता असते त्यांनी मोसंबीचा रस जरूर प्यायला हवा. मोसंबी मध्ये काही अशी आम्ल असतात जे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकायला मदत करतात. त्यात असलेले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठतेची समस्या दूर करायला मदत करतात. तंतुमय पदार्थ पोटातील आतड्यांसाठी चांगले असतात. त्याने आतड्यांची सफाई चांगली होते. हिरड्यांसाठी फायद्याचे असते चार चमचे मोसंबीचा रस, दोन चमचे पाणी आणि चिमूटभर सैंधव मीठ एकत्र करून हिरड्यांवर लावल्यास हिरड्यांवरील सूज, रक्त येणे या समस्या दूर होतात. त्याने हिरड्या मजबूत होतात कारण मोसंबीमध्ये सी जीवनसत्व असल्याने नव्या पेशी निर्माण व्हायला मदत होते. डोळ्यांसाठी उत्तम औषध एक ग्लास साध्या पाण्यात 3-4 थेंब मोसंबीचा रस टाकावा. त्या पाण्याने डोळे दिवसातून तीन-चार वेळा धुवावे. त्याने डोळे येण्याची म्हणजेच कंजेक्टिवाइटिसची समस्या दूर होते. या क्रियेच्या सहाय्याने डोळ्यांना कुठल्याही संसर्गापासून सुरक्षित ठेवता येते. रोगप्रतिकार शक्तीसाठी लाभदायी myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, मोसंबीमध्ये सी जीवनसत्व अधिकतम असल्याने त्याचा रस प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती अतिशय मजबूत होते. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी रोज एक ग्लास मोसंबीचा रस प्यायलाच हवा त्याने अनेक संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. अस्थमाच्या रुग्णांसाठी फायद्याचे मोसंबीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे मोसंबी रस अस्थमाच्या रुग्णांसाठी फायद्याचा असतो. अस्थमाच्या रुग्णांनी थोडं जिरं आणि आलं घालून हा रस प्यावा, त्याने त्यांना आराम मिळतो. पचन शक्ती चांगली होण्यास सहाय्यक उन्हाळ्यात पोटासंबंधी अनेक त्रास होतात. जसे अपचन, पित्त, बद्धकोष्ठता, जुलाब इत्यादी. मोसंबीमधे फ्लेवोनॉयड असते त्याने पचनशक्ती मजबूत होते. म्हणून मोसंबी रसाच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजार लवकर बरे होतात. कॅन्सरपासून वाचवते मोसंबी मध्ये डी-लिमोनेन आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात. त्याने स्तनांचा कॅन्सर होण्यास प्रतिबंध घालता येतो. जर नियमित पाणी सेवन केले तर त्याने 20% कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. ऋतुमानानुसार बळावणाऱ्या आजारांपासून वाचवते वातावरण बदलले की लोकांना सर्दी-खोकला अॅलर्जी यासारख्या समस्या होतात. जर मोसंबीचा रस रोज घेतला तर या समस्यांपासून लवकर आराम मिळतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पचनसंस्थेचे विकार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: