Home /News /lifestyle /

हॅक होता होता वाचलं स्वप्नील जोशीचं Instagram; शेअर केला चाहत्यांना अलर्ट करणारा VIDEO

हॅक होता होता वाचलं स्वप्नील जोशीचं Instagram; शेअर केला चाहत्यांना अलर्ट करणारा VIDEO

हॅकर्स इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी काय काय केलं हे स्वप्नील जोशीनं (Swapnil joshi instagram) व्हिडीओतून चाहत्यांना सांगितलं आहे.

  मुंबई, 04 डिसेंबर : अभिनेता स्वप्नील जोशीचं (Swapnil joshi) इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंट हॅक (hack) करण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्वप्नीलला त्याची वेळेत माहिती मिळाल्यानं हॅकर्सपासून (hackers) तो आपलं अकाऊंट वाचवू शकला आहे. मात्र आपल्या चाहत्यांना त्यानं अलर्ट केलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यानंतर स्वप्नीलनं चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यानं चाहत्यांना आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट कसं हॅक झालं ते सांगितलं आहे आणि तुम्ही त्यापासून कसं वाचू शकता, याबाबतही सल्ला दिला आहे. स्वप्नील जोशी म्हणाला, "रात्रीच्या वेळी मला इन्स्टाग्राम सपोर्ट नावाच्या अकाऊंटवरून मेसेज आला. हे फेक अकाऊंट वेरिफाइड दाखवत होतं. ज्यावर 77 हजार फॉलोअर्स होते. या अकाऊंटवरून मला तुम्ही कॉपीराइट नियमांचं उल्लंघन केलं आहे, असा मेसेज आला. हा मेसेज अगदी कायदेशीर भाषेत होता. त्यामुळे मी थोडा टेन्शनमध्ये आलो. लगेच माझ्या सोशल मीडिया टीमशी संपर्क केला"
  View this post on Instagram

  A post shared by (@swwapnil_joshi)

  "त्यानंतर आम्हाला समजलं की हे अकाऊंट फेक आहे. हॅकर्सकडून माझं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न होत होता. आम्हाला थोडी गडबड वाटली. कारण आमच्याकडून सतत आयडी, पासवर्ड, कोड मागितला जात होता. जवळजवळ दीड तास आमच्याकडे ते ही माहिती मागत होते. एक फॉर्म भरायला सांगत होते. माझ्या सोशल मीडियाच्या सतर्कतेमुळे मी माझं अकाऊंट वाचवू शकलो", असं स्वप्नीलनं सांगितलं. हे वाचा - नीतू कपूर, वरुणपाठोपाठ अनिल कपूरलाही कोरोना; Jug Jug Jiyo चे कलाकार संक्रमित "नंतर मला समजलं की असं बऱ्याच सेलिब्रिटींसह होतं आहे. ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, त्यांचं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला जदातो आहे. त्यामुळे तुम्हीही अलर्ट व्हा. कितीही वेरिफाइड अकाऊंट असलं तरी कोणताही अर्ज भरू नका, त्यांना पासवर्ड, आयडी देऊ नका", असं आवाहनही त्यानं चाहत्यांना केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Instagram, Swapnil joshi

  पुढील बातम्या