मुंबई, 29 मार्च : व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्यायाम केल्याने एकूणच आरोग्य सुधारते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने या महिन्याच्या सुरुवातीला खुलासा केला की, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने तिचा जीव वाचला. या खुलाशानंतर काही आठवड्यांनंतर सुष्मिता सेनवर उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव भागवत यांनी एका मुलाखतीत अभिनेत्रीबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. यामध्ये त्यांनी सुष्मिता सेनचा जीव कसा वाचला आणि व्यायामाबाबत लोकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगितले.
मुंबईतील कार्डिओलॉजिस्ट राजीव भागवत यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सुष्मिता सेन फिटनेस फ्रीक आहे आणि ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहते. योग्यप्रकारे व्यायाम केल्याने सुष्मिता सेनला हृदयविकाराच्या झटक्याने कमी नुकसान झाले आणि तिचा जीव वाचू शकला. सक्रिय शारीरिक जीवनामुळे लोकांच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि हृदयाचे आरोग्य मजबूत होते. व्यायाम योग्य प्रकारे केला तर आजारांना बऱ्याच अंशी आळा घालता येतो. व्यायामशाळेत जाऊन जास्त व्यायाम करणे देखील हानिकारक ठरू शकते. म्हणूनच वर्कआउट्स सावधगिरीने केले पाहिजेत.
आठवड्यातून किती दिवस व्यायाम करावा
अभिनेत्रीवर उपचार करणाऱ्या कार्डिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस व्यायाम केला पाहिजे. व्यायाम रोज करू नये. व्यायामानंतर शरीराला व्यायामाच्या ताणातून सावरण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जर शरीराला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल, तर तुम्हाला व्यायामाचा फायदा मिळणार नाही. पुरेशी झोप आणि विश्रांती न घेता सतत व्यायाम केल्याने हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत मोठे धोके निर्माण होऊ शकतात.
जास्त वेळ जिममध्ये राहणेही आहे धोकादायक
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये असतानाही लोकांनी अनेक काही घ्यायला हवी. जास्त व्यायाम करू नये आणि दररोज 7-8 तासांची झोप घेतल्यानंतरच जिममध्ये जावे. जिमला फॅशन बनवू नये आणि ती एक आरोग्यदायी अॅक्टिव्हिटी मानली पाहिजे. जास्त व्यायाम करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि त्यातून अनेक मोठे धोके उद्भवू शकतात. जिमला जाण्यापूर्वी पुरेशी झोप न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle