Happy B'Day Sushmita Sen : फक्त एका मेसेजमुळे सुरू झाली माजी मिस युनिव्हर्सची लव्ह स्टोरी

Happy B'Day Sushmita Sen : फक्त एका मेसेजमुळे सुरू झाली माजी मिस युनिव्हर्सची लव्ह स्टोरी

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या (sushmita sen) अनोख्या भूमिकांबरोबरच तिचं लव्ह लाईफदेखील तितकंच अनोखं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (sushmita sen) हिचा आज 45 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशकापासून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. यावर्षी तिने हॉटस्टारच्या आर्या या वेब सीरींजमधून धमाकेदार पुनरागमन केले. तिच्या अनोख्या भूमिकांबरोबरच तिचे लव्ह लाईफ देखील तितकंच अनोखं आहे.

सुश्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलची भेट इन्स्टाग्रामवर झाली होती. एका मेसेजमुळे त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेननं आपल्या लव्ह लाइफबाबत माहिती सांगितली होती. इन्स्टाग्रामवर रोहमनने सुश्मिताला एक मेसेज पाठवला होता. यामध्ये रोहमननं एक सुंदर गाणं गायलं होतं, सुश्मिताची तारिफ केली होती. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झालं आणि नात्याला सुरुवात झाली.

सध्या तो तिच्या कुटुंबाचाच भाग झाला असून अनेकदा सुश्मिताच्या मुलींबरोबर देखील तो दिसून येत असतो. त्यांच्यातील प्रेमळ क्षणांवर एक नजर टाकूयात

या पोस्टमध्ये सुश्मिताच्या गालांवरील खळींचं कौतुक करताना रोहमन. सुश्मितादेखील रोहमनचं कौतुक करते आहे.

सुश्मिता सेन फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. त्याचबरोबर रोहमन देखील त्याचे फोटो शेअर करत असतो. अनेक फोटोंमध्ये रोहमन व्यायामावेळी सुश्मिताला उचलून घेतलेलं देखील दिसून येतं.

अनेकदा दोघंजण एकत्र फिरताना दिसतात. कधी न्यूयॉर्कमध्ये शॉपिंग करताना तर कधी लंडनच्या थंडीमध्ये देखील दिसून येतात.

या फोटोत दोघंजण सुश्मिताच्या मुलींसोबत दिसूत आहेत. या फोटोत सुश्मिता आणि रोहमन रिनी आणि अलिशासोबत दिसून येत आहे.

या फोटोत दोघंजण आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. समुद्रकिनारी हे कपल फिरत असतानाचे हे फोटो आहेत.

Published by: Priya Lad
First published: November 19, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या