कार्डिअॅक अरेस्टने सुषमा स्वराज यांचं झालं निधन, जाणून घ्या याची लक्षणं

कार्डिअॅक अरेस्टने सुषमा स्वराज यांचं झालं निधन, जाणून घ्या याची लक्षणं

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक येण्यासारखं किंवा हार्ट फेल होण्यासारखं नाही.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट- भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टनंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. 70 मिनिटं त्या मृत्यूशी झुंजत होत्या. अखेर रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अनेकजण हार्ट अटॅकला कार्डिअॅक अरेस्ट समजतात. पण या दोन्हींमध्ये फरक आहे. कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती याबद्दल जाणून घेऊ.

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक येण्यासारखं किंवा हार्ट फेल होण्यासारखं नाही. हृदयात होणाऱ्या गडबडीमुळे हृदयाच्या ठोक्यांवर याचा परिणाम होतो. यामुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही आणि मेंदूला होणारा ऑक्सीजन आणि रक्ताभिसरण पुरवठा पूर्णपणे थांबतो तेव्हा व्यक्ती बेशुद्ध होतो. यालाच कार्डिअॅक अरेस्ट असं म्हणतात, कारण बेशुद्ध झाल्यानंतर काही काळात व्यक्तिचा मृत्यूही होऊ शकतो.

कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं-

-कार्डिअॅक अरेस्टमध्ये रुग्ण दीर्घ श्वास घेऊ शकत नाही.

-कार्डिअॅक अरेस्टच्या स्थितीत हृदयात असह्य वेदना जाणवू लागतात, ज्यांना सहन करणं जवळपास अशक्य असतं.

-कार्डिअॅक अरेस्टच्या आधी थकव्यासारखंही वाटतं.

-अचानक हृदयाचे ठोके वाढतात.

-चक्कर येते.

-शुद्ध हरपते.

यामुळे वाढतो कार्डिअॅक अरेस्टचा धोका-

-धूम्रपान

-कोलेस्ट्रॉल

-हाय ब्लडप्रेशर आमि हायपर टेंशन

-मधुमेह

-नियमितपणे व्यायाम किंवा योग न करणं

या उपायांनी कार्डिअॅक अरेस्टपासून वाचू शकतो-

-फास्ट फूड खाण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

-कार्डिअॅक अरेस्टपासून वाचण्यासाठी नियमितपणे संपूर्ण शरीराची चाचणी करत राहणं आवश्यक आहे.

VIDEO: एक कणखर नेतृत्व हरपलं; आठवणीतल्या सुषमा स्वराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या