मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'सुशांत सिंह राजपूतला Bipolar disorder चा त्रास होता', काय आहे हा आजार?

'सुशांत सिंह राजपूतला Bipolar disorder चा त्रास होता', काय आहे हा आजार?

या प्रकरणाच्या तपासात सुशांतच्या मानसोपचारतज्ज्ञांनी त्याला बायपोलर डिसऑर्डर होती, असा खुलासा केला आहे. Bipolar असणं म्हणजे नेमकं काय?

या प्रकरणाच्या तपासात सुशांतच्या मानसोपचारतज्ज्ञांनी त्याला बायपोलर डिसऑर्डर होती, असा खुलासा केला आहे. Bipolar असणं म्हणजे नेमकं काय?

या प्रकरणाच्या तपासात सुशांतच्या मानसोपचारतज्ज्ञांनी त्याला बायपोलर डिसऑर्डर होती, असा खुलासा केला आहे. Bipolar असणं म्हणजे नेमकं काय?

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI तपास करत आहे. पण तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी सुशांतच्या डॉक्टरांचा नोंदवलेला जबाब आता समोर आला आहे. सुशांतवर उपचार करणाऱ्या दोन मानसोपचार तज्ज्ञांनी सुशांतला नैराश्य, अस्वस्थता याचा त्रास व्हायचा, सुशांतला सतत भीती वाटायची आणि तो Bipolar होता अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

आपण या Bipolar disorder मधून कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणि त्याचा कुटुंबाला त्रास होईल, असं सुशांतला वाटू लागलं होतं. त्यानं यावरची औषधं घेणंही थांबवलं होतं, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. पण हे बायपोलर असणं म्हणजे नेमकं काय?

काय आहेत लक्षणं?

तुम्हाला कधी प्रचंड मूड स्विंग्ज, अस्वस्थता अनुभवायला आली आहे का? जेव्हा कधीकधी शरीरात प्रचंड ऊर्जा असल्यासारखं वाटतं आणि टोकाचा उत्साह असतो, तर कधी एकदम गळून गेल्यासारखं, निराश आणि टोकाचं वैफल्य असल्यासारखं वाटतं. अशा दोन टोकाच्या भावना जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये वारंवार दिसू लागतात, तेव्हा ती व्यक्ती बायपोलर डिसऑर्डरची शिकार असल्याचं समजलं जातं.

कसं ओळखायचं bipolar असणं? कुठली चाचणी?

बायपोलर डिसऑर्डर ओळखायला एक अशी चाचणी नाही. इंटरनेटवरवरसुद्धा काही मनोवैज्ञानिक क्विझ दिलेल्या आहेत. मनोवैज्ञानिक किंवा मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाला काही प्रश्न विचारतात आणि त्यातून बायपोलर असल्याचा निष्कर्ष काढला जातो. टोकाचे विचार मनात येणं, टोकाचे मूड स्विंग्ज हे बायपोलर असण्याचं लक्षण आहे. काही तास, काही दिवस, काही महिने असे मूड स्विंग अटॅक टिकू शकतात.

कशामुळे होतो हा आजार?

ब्रिटनच्या NHS नुसार, बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं कारण अद्याप सापडलेलं नाही. मेंदूत होणाऱ्या कसल्याशा अज्ञात केमिकल्सच्या स्रावामुळे हा आजार होऊ शकतो. तीन प्रकार यात आहेत. Bipolar I Disorder, Bipolar II Disorder आणि Cyclothymic Disorder. सायक्लोथिमॅटिक डिसऑर्डर हा मानसिक आजाराचा कमी गुंतागुंतीचा टप्पा समजला जातो.

काय आहे इलाज?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, बायपोलर डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्ती औषधोपचारांच्या मदतीने नॉर्मल आयुष्य जगू शकतात. या उपचारांमध्ये औषधांबरोबरच सायकोथेरपीचा समावेश होतो. मूड स्टॅबिलायझर, अँटिसायकोटिक्स औषधं तज्ज्ञ डॉक्टर उपचारांसाठी वापरतात. नैराश्यावर मात करण्यासाठी कौन्सेलिंग आणि अँटिडिप्रेशंट्स मेडिसिन दिली जातात.

कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींना आहे हा आजार?

बायपोलर डिसऑर्डर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आहे किंवा होती. यामध्ये मरलिन मन्रोपासून कॅथरिन झिटा-जोन्सपर्यंत काही हॉलिवूड सेलेब्रिटींचा समावेश आहे. रॅप सिंगर हनी सिंगसुद्धा बायपोलर आहे.

बायपोलर व्यक्ती कशी असू शकते?

बायपोलर व्यक्तीला भास होऊ शकतात. त्यांना अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD)असू शकते. म्हणजेच कुठल्याही एका गोष्टीत मन एकाग्र करणं कठीण असतं. अशा व्यक्ती कायम उतावीळ किंवा अस्वस्थ असतात. अशा व्यक्ती तुलनेने लवकर दारू किंवा ड्रग्जच्या आहारी जाण्याची शक्यता असू शकते.

First published:

Tags: Sushant Singh Rajput