Home /News /lifestyle /

एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्ण करतेय सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्नं; पाहा VIDEO

एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्ण करतेय सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्नं; पाहा VIDEO

सुशांत सिंह राजपूतचं (Sushant singh rajput) स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) पुढाकार घेतला आहे.

  मुंबई, 07 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) अनेक स्वप्नं पाहिली. त्यांची यादी तयार केली. ती स्वप्नं पूर्ण कऱण्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि त्यापैकी बहुतेक स्वप्नं त्याने पूर्णही केली. मात्र त्याची काही स्वप्नं अर्धवट राहिली आहेत. त्यापैकी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) पुढाकार घेतला आहे. सुशांतच्या स्वप्नांची यादीतील 50 स्वप्नांपैकी एक होतं ते म्हणजे 1,000 झाडं लावण्याचं स्वप्नं. सुशांतने त्याची बहुतेक स्वप्नं पूर्ण केली आहेत. मात्र हे स्वप्नं तो पूर्ण करू शकला नाही. अंकिता लोखंडे त्याचंं हे स्वप्नं पूर्ण करणार आहे. 6 ऑगस्टला रविवारी अंकिता लोखंडे रोपं खरेदी करताना दिसली.
  विरल भयानी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये अंकिता म्हणाली, "सुशांतच्या 50 स्वप्नांपैकी एक होतं ते म्हणजे 1000 झाडं लावणं. सुशांतच्या बहिणीने यासाठी आता मोहीम सुरू केली आहे. मीदेखील माझ्या घरापासून याची सुरुवात करत आहे. माझं सर्वांना आवाहन आहे, की त्यांनीदेखील वृक्षारोपण करावं" हे वाचा - प्रेग्नंट करीना कपूरला भेटली होती कोरोनाग्रस्त मलायका अरोरा; PHOTO VIRAL सुशांतचं वृक्षारोपणाचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) #Plants4SSR ही मोहीम सुरू केली आहे. सुशांतचं वृक्षारोपणांचं स्वप्नं साकारण्यासाठी चाहत्यांनीदेखील या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन सुशांतच्या बहिणीनं केलं आहे. त्यानंतर अंकिता रोपं खरेदी करायला गेली. सुशांतचं हे स्वप्न साकार करण्यात तीदेखील हातभार लावणार आहे.
  View this post on Instagram

  Can we make this happen? Let’s do it for our Sushant! #Plant4SSR

  A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा सीबीआय आणि एनसीबीकडून तपास सुरू आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. दोघांनीही  9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर रियाची चौकशी सुरू आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या