बहिणीच्या नवऱ्याबरोबर सुशांतचे whatsapp chat आले समोर; या विषयांवर व्हायची चर्चा

बहिणीच्या नवऱ्याबरोबर सुशांतचे whatsapp chat आले समोर; या विषयांवर व्हायची चर्चा

सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) बहीण श्वेता किर्ती सिंहचा नवरा विशाल किर्ती (vishal kirti) आणि सुशांत यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, ते समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला (Sushant Singh Rajput Death) तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला. सीबीआय, एनसीबी आणि ईडी अशा तीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत त्याचा मृत्यूबाबत खुलासा झालेला नाही. मात्र या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला आहे. त्या दिशेनं आता तपासाला अधिक वेग आला आहे. अशात आता सुशांत सिंह राजपूतचे भावोजी विशाल कीर्ती (Vishal Kirti) यांनी सुशांतसह झालेला आपला व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं व्हायचं हे त्यांनी सांगितलं आहे.

विशाल किर्ती यांनी आपल्या ट्वीटवर या चॅटचा स्क्रिनशॉट टाकला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करताना त्यांनी पोस्टही लिहिली आहे. यामध्ये सुशांत आणि विशाल दोघंही पुस्करांबाबत बोलताना दिसत आहे.

विशाल म्हणाले, "मी तुमच्यासह सुशांत सिंह राजपूतच्या चॅटची काही अविस्मरणीय असे क्षण तुमच्यासह शेअर करत आहे. एकमेकांसमोर बसून बोलणं एक सुखद अनुभव असतो, तसंच डिजीटल संवाद म्हणजे तो क्षण लक्षात ठेवण्याचा एक उत्तम असा मार्ग आहे"

हे वाचा - सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

दरम्यान सुशांत प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे. सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश असल्याचं समोर व्हिसेरा रिपोर्टमधून समोर आलं आहे. केमिकलमुळेच सुशांतचा मृत्यू झाला का, याचा तपास होणार आहे. या रिपोर्टमधील माहिती समोर आल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.

हे वाचा - अनुराग कश्यप नेमका कसा आहे? EX WIFE कल्की कोचलिनने सर्वांसमोर आणलं खरं रूप

सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली होती? याबाबतच्या निष्कर्षावर येण्यासाठी व्हिसेरा रिपोर्टची मदत होण्याची शक्यता आहे.

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading