Home /News /lifestyle /

Surya Gochar 2022: जुलै महिन्यात या 3 राशींच्या लोकांचं नशीब राहणार जोमात; सूर्यदेवांची कृपा

Surya Gochar 2022: जुलै महिन्यात या 3 राशींच्या लोकांचं नशीब राहणार जोमात; सूर्यदेवांची कृपा

राहू - 
राहुचा नकारात्मक प्रभाव टाळायचा असेल तर आंघोळीच्या पाण्यात कस्तुरी, धूप मिसळून स्नान करा.

केतू - 
केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लोबान, लाल चंदन मिसळून स्नान केल्यास फायदा होईल.

राहू - राहुचा नकारात्मक प्रभाव टाळायचा असेल तर आंघोळीच्या पाण्यात कस्तुरी, धूप मिसळून स्नान करा. केतू - केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लोबान, लाल चंदन मिसळून स्नान केल्यास फायदा होईल.

सूर्याच्या राशी बदलाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. 16 जुलै रोजी सूर्यदेवांचा राशी बदल तीन राशींचे भाग्य उजळवू शकतो. या दरम्यान सूर्यदेवाची या राशींवर विशेष कृपा असेल.

    मुंबई, 05 जुलै : सूर्यदेव दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, आता सूर्यदेव 16 जुलै रोजी आपली राशी बदलतील. सूर्यदेव मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या राशी बदलाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. 16 जुलै रोजी सूर्यदेवांचा राशी बदल तीन राशींचे भाग्य उजळवू शकतो. या दरम्यान सूर्यदेवाची या राशींवर विशेष कृपा असेल. जाणून घेऊया संपूर्ण महिना कोणत्या राशींवर राहील (Surya Rashi Parivartan 2022 July) सूर्यदेवाची खास कृपा. 1. मेष - कर्क राशीतील सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला नोकरीत बढतीही मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापाऱ्यांना मोठ्या व्यवहारातून नफा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. 2. वृषभ - कर्क राशीतील सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची जागा बदलण्याची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार 3. मिथुन - सूर्याचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना जुलै महिन्यात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी-व्यावसायिकांना पदोन्नतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते. धनसंचय होण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम (सूचना: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या