मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Surya Nutan Solar Stove: फक्त 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह, सिलेंडर घेण्याची गरज भासणार नाही

Surya Nutan Solar Stove: फक्त 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह, सिलेंडर घेण्याची गरज भासणार नाही

Surya Nutan: फक्त 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह, सिलेंडर घेण्याची गरज भासणार नाही

Surya Nutan: फक्त 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह, सिलेंडर घेण्याची गरज भासणार नाही

Surya Nutan Solar Stove : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हची निर्मिती केली आहे. या स्टोव्हची खास गोष्ट म्हणजे हा स्टोव्ह उन्हात ठेवण्याची गरज नाही.

    मुंबई, 16 ऑगस्ट: गॅसच्या वाढत्या किमती (Gas Prices) असो की विक्रमी महागाई (Inflation), आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हची निर्मिती केली आहे. या स्टोव्हची खास गोष्ट म्हणजे हा स्टोव्ह उन्हात ठेवण्याची गरज नाही. स्टोव्हचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात किंवा तुमच्या सोयीनुसार कुठेही करू शकता. इंडियन ऑईलने या सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्टोव्हला सूर्य नूतन (Surya Nutan Solar Stove) असं नाव दिलं आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि हरदीप सिंग पुरी यांनी यापूर्वी इंडियन ऑइलच्या या स्टोव्हची पाहणी केली होती. एका सरकारी निवेदनात म्हटलं आहे की, केंद्रीय मंत्र्यांनी इंडियन ऑइलच्या या नवकल्पनेचं कौतुक केलं. त्यानंतर हा स्टोव्ह हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानी प्रदर्शित करण्यात आला. यादरम्यान केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्या निवासस्थानी उत्तर प्रदेशचे अर्थ आणि वित्त मंत्री आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी, संसदीय कार्य मंत्री सुरेश खन्ना, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, इंडियन ऑइलचे संचालक (आर अँड डी) डॉ. एसएसव्ही. रामकुमार आदी उपस्थित होते. हेही वाचा- Loan on PAN Card: पॅन कार्डवरून मिळवू शकता वैयक्तिक कर्ज, प्रोसेस आहे खूपच सोपी नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानं प्रेरित होऊन सूर्य नूतन विकसित करण्यात आल्याचं इंडियन ऑईलनं सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना संबोधित करताना, वापरण्यास सोपा आणि पारंपारिक चुलींची जागा घेऊ शकणार्‍या स्वयंपाकघरासाठी उपाय विकसित करण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या या चर्चेनं प्रेरित होऊन सोलर कुक टॉप ‘सूर्य नूतन’ विकसित करण्यात आला आहे. सूर्या नूतन सोलर कुक टॉपमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. एकाच ठिकाणी कायमस्वरूपी ठेवता येतं. ही रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम आहे. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास केंद्र, फरीदाबाद यांनी ही सिस्टीम डिझाइन आणि विकसित केली आहे. इंडियन ऑईलनं त्याचं पेटंटही घेतलं आहे. त्याचं एक युनिट सूर्यप्रकाशात राहतं आणि चार्ज होत असतानाही त्यावर कुकिंग करता येतं. याशिवाय चार्ज केल्यानंतरही वापरता येणार आहे. अशाप्रकारे 'सूर्य नूतन' द्वारे सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हा स्टोव्ह हायब्रिड मोडवरही काम करतो. म्हणजेच सौरऊर्जेशिवाय या स्टोव्हमध्ये विजेचे इतर स्रोतही वापरता येतील. सूर्य नूतन तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. सूर्या नूतनचे प्रीमियम मॉडेल चार जणांच्या कुटुंबासाठी पूर्ण जेवण (नाश्ता + दुपारचे जेवण + रात्रीचे जेवण) बनवू शकते.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: LPG Price

    पुढील बातम्या