मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Online Yoga Session : ताण आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार, काय आहे योग्य पद्धत? पाहा VIDEO

Online Yoga Session : ताण आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार, काय आहे योग्य पद्धत? पाहा VIDEO

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

योगासनांमध्ये सर्वात सोपं आणि सर्वांगसुंदर प्रकार म्हणजे सूर्य नमस्कार (Sooryanamaskar). ताण-ताणव कमी कमी करण्यासाठी आणि वजनही कमी करण्यासाठी कशा पद्धतीने हे नमस्कार करायचे पाहा VIDEO.

    कोरोनाच्या या काळात आलेल्या निर्बंधामुळे सगळ्यांनाच मानसिक ताण जाणवत आहे. घरात बसून सर्वांना कंटाळा आला आहे;पण बाहेर जाणं शक्य नाही. अशावेळी उपयुक्त ठरत आहे ती योगसाधना (Yoga). घरात राहून करता येणारी अनेक योगासनं आहेत. योगासनांमुळे मानसिक ताणतणाव (Mental Stress) दूर होण्यास तसंच वजन (Weight )कमी करण्यासही मदत होते.

    यामध्ये सर्वात सोपे आणि उत्तम आसन आहे ते म्हणजे सूर्य नमस्कार (Sooryanamaskar). न्यूज 18 हिंदीच्यावतीनं सूर्य नमस्काराबाबत 55 मिनिटांचे लाईव्ह योग सेशन घेण्यात आलं. सूर्य नमस्कार केल्याने ताणतणाव दूर होतो, बॉडी डिटॉक्स (Detox)होते आणि लठ्ठपणाही कमी होतो. मासिक पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांसाठीही ते खूप फायदेशीर आहे. यामुळे पाठीचा कण मजबूत होतो. परंतु ज्या लोकांना उच्च रक्तदाब,पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी सूर्य नमस्कार करू नये. मासिक पाळीत समस्या असलेल्या स्त्रियांसाठी हे खूप फायदेशीर आहे. पाठीचा कण मजबूत आहे. परंतु ज्या लोकांना उच्च रक्तदाब,पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी सूर्य नमस्कार करू नये. याशिवाय मासिक पाळीच्या काळात आणि गर्भवती महिलांनीही सूर्य नमस्कार करू नयेत. श्वासाचे काही व्यायाम केल्यानं शरीराची लवचिकताही वाढते आणि लठ्ठपणादेखील कमी होतो.

    सूर्यनमस्कार : सूर्यनमस्कार हे सर्व योगासनांमध्ये सर्वात शक्तिशाली,सर्वांगसुंदर आसन मानले जाते. अनेक लोक सूर्य नमस्कार घालतात;पण फार कमी लोकांना याची योग्य पद्धत माहीत आहे.

    या दोन किचनमधल्या गोष्टी फुफ्फुसांसाठी उपयुक्त; ऑक्सिजनची पातळीही राहील नीट

    प्रणाम आसन : सर्वप्रथम हे आसन करण्यासाठी चटईच्या एका टोकाला उभे राहा. आपले तळहात जोडून नमस्कार करा. मग दोन्ही हात वर न्या आणि नमस्कारासाठी जोडा.

    हस्ततुन्नासन: दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या बाजूला करा. आता हात आणि कंबर वाकवत दोन्ही हात आणि मानही मागच्या बाजूस न्या.

    हस्तपाद आसन : आता या आसन स्थितीत हळूहळूश्वास सोडत पुढील बाजूला वाका. दोन्ही हात कानाजवळून फिरवत जमिनीवर न्या.

    अश्व संचालन आसन : यामध्ये हात जमिनीवर ठेवून श्वास घेत उजवा पाय मागे न्या आणि डावा पाय गुडघ्यातून वाकवा. मान उंच करा आणि याच स्थितीत काही काळ थांबा

    पर्वतासन : श्वास घेत डावा पाय मागे घ्या आणि संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत ठेवा आणि आपले हात सरळ जमिनीवर ठेवा.

    अष्टांग नमस्कार: आता आपले दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवा आणि श्वास घ्या. छाती आणि हनुवटीला जमिनीवर स्पर्श करेल अशा स्थितीत काही काळ पडून रहा.

    भुजंग आसन: आता श्वास सोडताना हळू हळू आपली छाती पुढे घ्या. हात सरळ जमिनीवर ठेवा. मान मागे न्या आणि दोन्ही पाय सरळ ठेवा.

    पाहा VIDEO

    शवासन : चटईवर पाठीवर झोपून डोळे बंद करा. आपले पाय आरामात ठेवा. पायांचे तळवे आणि बोटं वरच्या बाजूस असावेत. हाताचे तळवे शरीरालगत आणि वरच्या दिशेने उघडे ठेवा. पायापासून शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करा आणि हळू हळू श्वास बाहेर सोडा.डोळे बंद करून या स्थितीत काहीवेळ विश्रांती घ्या.

    First published:

    Tags: Lifestyle, Yoga