मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Surya Grahan 2021: या दिवशी आहे वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, वाचा काय आहे वेळ

Surya Grahan 2021: या दिवशी आहे वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, वाचा काय आहे वेळ

वर्ष 2021मधलं शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हिंदू पंचांगनुसार, 4 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातली अमावास्या आहे.

वर्ष 2021मधलं शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हिंदू पंचांगनुसार, 4 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातली अमावास्या आहे.

वर्ष 2021मधलं शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हिंदू पंचांगनुसार, 4 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातली अमावास्या आहे.

  नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Purnima 2021) दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण (last Lunar eclipse in 2021) होतं. या चंद्रग्रहणानंतर 15 दिवसांनी वर्षातलं शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण (Surya Grahan 2021) होईल. सूर्यग्रहण ही (astrology) एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. सूर्यग्रहणाचं वैज्ञानिक महत्त्व ( scientific importance) खूप आहे. ग्रहण ही ज्योतिषशास्त्रात अशुभ घटना म्हणून गणली जाते. यामुळेच या काळात पूजा आणि शुभ कार्य केलं जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचं तेज कमी होते. वर्षातल्या शेवटच्या सूर्यग्रहणाची तारीख, वेळ आणि परिणाम जाणून घेऊ या.

  'या' दिवशी आहे सूर्यग्रहण

  वर्ष 2021मधलं शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हिंदू पंचांगनुसार, 4 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातली अमावास्या आहे.

  सूर्यग्रहण वेळ

  वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 3 वाजून 7 मिनिटांनी संपेल.

  सूर्यग्रहण कुठे दिसणार?

  वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

  सूर्यग्रहण काळात ही कामं करणं टाळा

  - सूर्यग्रहण काळात कोणत्याही निर्जन ठिकाणी जाऊ नका. कारण यावेळी नकारात्मक शक्ती खूप प्रभावी होत असतात. तसंच सूर्यग्रहणाचे वेध सुरू झाल्यानंतर चुकूनसुद्धा काही खाऊ नये.

  - सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी अजिबात पाहू नये. कारण असं केल्याने तुमच्या डोळ्यांना दुखापत होऊ शकते.

  - सूर्यग्रहण काळात देवाच्या मूर्तींना हात लावू नका. असं केल्याने मूर्ती अपवित्र होते, असं मानलं जातं.

  - सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी स्वयंपाकाचं कोणतंही काम करू नये किंवा सुई-धागा वापरू नये.

  - सूर्यग्रहणाचे वेध लागल्यानंतर कोणतंही शुभकार्य सुरू करू नका. कारण त्या शुभकार्याचं चांगलं फळ मिळणार नाही.

  वर्ष 2021 मध्ये दोन सूर्यग्रहणं होती. त्यापैकी पहिलं सूर्यग्रहण 10 जून 2021 रोजी ज्येष्ठ अमावस्येला झालं होतं. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहणदेखील संपूर्ण भारतात दिसले नव्हते. केवळ भारताच्या ईशान्येकडच्या अगदी काही भागांत ते दिसलं होतं. आता चालू वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण 4 डिसेंबरला होत आहे. सूर्यग्रहणामुळे काही जणांना डोळ्यांशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात. सूर्यग्रहण आरोग्याच्या दृष्टीने चांगलं समजलं जात नाही. वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण भारतात उपच्छाया ग्रहण असेल. त्यामुळे सूर्यग्रहणाचे वेध आणि अन्य नियम भारतात लागू होणार नाहीत.

  (Disclaimer: या लेखामधली काही तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

  First published: