मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सूर्यग्रहणानंतर घरातली ही कामं करा, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

सूर्यग्रहणानंतर घरातली ही कामं करा, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

 (Surya Grahan 2020) अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहण संपल्यावर केल्या की पैशांची कमतरता भासणार नाही जाणून घ्या.

(Surya Grahan 2020) अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहण संपल्यावर केल्या की पैशांची कमतरता भासणार नाही जाणून घ्या.

(Surya Grahan 2020) अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहण संपल्यावर केल्या की पैशांची कमतरता भासणार नाही जाणून घ्या.

    मुंबई, 14 डिसेंबर : (Surya Grahan 2020) आज वर्षातलं अखेरचं सूर्यग्रहण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र त्याचा परिणाम जरी प्रत्यक्षात आपल्यावर होणार नसला तरी आपल्या ग्रहांवर आणि वातावरणावर ऊर्जेवर होत असतो. ग्रहण काळात सूर्याकडे पाहाणं अशुभ मानलं जातं. मात्र ग्रहण संपल्यानंतर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या घरी कधी पैशांची कमतरता जाणवणार नाही असं देखील सांगितलं जातं. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर पैशांची कमतरता भासणार नाही जाणून घ्या. - आपल्याकडे दान करण्याला खूप महत्त्व आहे. दान दिल्यानं पुण्य मिळतं त्याचप्रमाणे आपली पापंही कमी होतात असं पुराणात म्हटलं जातं. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर एका गरजू व्यक्तीला त्याला हवी असलेली वस्तू दान करा. - ग्रहणानंतर आंघोळ करुन शरीर शुद्ध करण्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ग्रहण संपल्यावर सर्वातआधी अंघोळ करा आणि नवीन धुतलेले स्वच्छ कपडे घाला. ग्रहणादरम्यान त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे तो टाळण्यासाठी अंघोळीला फार महत्त्व आहे. - ग्रहण संपल्यानंतर कोणत्याही मंदिरात जाऊन किंवा घरी आपल्या देवांची पूजा करा. पूजा आणि देवाचं नामस्मरण केल्यानं ग्रहणादरम्यान घरात किंवा आपल्या भोवताली पसरलेली नकारात्मकता नष्ट होण्यास मदत होईल. - ग्रहण संपल्यानंतर ताजं कणीक मळा आणि गायीला पोळी खायला द्या. असं केल्यानं लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि घरात पैसा खेळत राहतो, असे काहींचे मत आहे. हे वाचा-अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही, पण या गोष्टींची काळजी घ्या - ग्रहण संपल्यानंतर घरातील देवघराची साफसफाई करा. देवाची वस्त्र बदला. घरात धूप किंवा अगरबत्ती लावा त्यामुळे घर प्रसन्न राहिल. या वर्षातील हे शेवटचं सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेतून दिसेल. यंदा हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं नागरिकांना देखील सूतक काळ पाळावा लागणार नाही. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागांत दिसून येईल. हे ग्रहण 5.30 तास असणार आहे. बिहारसह भारतामध्ये सावली असेल. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 7:03 वाजता सुरू होईल आणि रात्री 12: 23 वाजता संपेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या