Solar Eclipse 2020: सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

Solar Eclipse 2020: सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

5 तासांच्या या (surya grahan) ग्रहणाचा 12 राशींवर काय पडणार प्रभाव जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : (solar eclipse 2020) 2020 या वर्षातलं आज शेवटचं सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण जरी भारतात दिसणार नसलं तरी राशींवर याचा प्रभाव पडणार आहे. ज्यांची लग्न रास वृश्चिक आणि मिथुन आहे त्यांच्यावर या ग्रहणाचा (surya grahan) प्रभाव असणार आहे. 5 तासांच्या या ग्रहणाचा 12 राशींवर (Horoscope) काय पडणार प्रभाव जाणून घ्या.

मेष- आज मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे सावधान राहा. ग्रहणकाळात पैशांची देणं-घेणं टाळा.

वृषभ- वैवाहिक जीवनात सावधान राहा. आज स्वत:वर नियंत्रण आणि संयम ठेवं अत्यावश्यक आहे. याशिवाय ग्रहण काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन- या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहणकाळ खूप शुभ असणार आहे. अडकलेली कामं आज मार्गी लागणार आहेत.

कर्क- मुलांची विशेष काळजी घ्या. ग्रहणकाळात कोणतेही निर्णय घेण्याचं धाडस नको.

सिंह- संपत्ती आणि आर्थिक समस्या जाणवतील. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या- नोकरीत यश मिळेल अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा आपला दिवस खूप चांगला आहे.

हे वाचा-सूर्यग्रहणानंतर घरातली ही कामं करा, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

तुळ- आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

वृश्चिक- आरोग्य आणि वाईट गोष्टींत अडकणार नाही याकडे लक्ष द्या. आज निश्चित झालेला विवाह तुटण्याचे अशुभ योग आहेत.

धनु- प्रवास करताना सावधानता बाळगा. सतर्क राहा आणि ग्रहण काळात शक्यतो बाहेर टाणं टाळा.

मकर - हे ग्रण शुभ शकुन घेऊन येईल. नोकरी आणि अनेक चांगल्या बातम्या आपल्याला मिळतील.

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी बेजबाबदारपणे वागणं टाळा. कामाच्या ठिकाणी आपला दबदबा राहिल एकूण हे ग्रहण आपल्यासाठी फायद्याचं आहे.

मीन- नोकरी अथवा व्यवसाय बदलण्याचं धाडस नको. मनासिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचा-या दिवशी लाँच होणार Realme Watch S Pro आणि ब्ल्यूटूथ इयरफोन; काय आहेत फीचर्स

कुठे दिसणार ग्रहण आणि काय असेल वेळ?

या वर्षातील हे शेवटचं सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेतून दिसेल. यंदा हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं नागरिकांना देखील सूतक काळ पाळावा लागणार नाही. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागांत दिसून येईल. हे ग्रहण 5.30 तास असणार आहे. बिहारसह भारतामध्ये सावली असेल. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 7:03 वाजता सुरू होईल आणि रात्री 12: 23 वाजता संपेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 14, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या