Home /News /lifestyle /

Surya Gochar 2022: नवी नोकरी, भरपूर पैसे; सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे 'या' 3 राशींचा होणार भाग्योदय 

Surya Gochar 2022: नवी नोकरी, भरपूर पैसे; सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे 'या' 3 राशींचा होणार भाग्योदय 

रवी दर महिन्याला राशिपरिवर्तन करतो. त्यामुळे रवीचं गोचर विशेष महत्त्वाचं ठरतं. 15 जून रोजी रवी शुक्राच्या वृषभ राशीतून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करत आहे.

    नवी दिल्ली, 7 जून : मानवी जीवनावर ग्रह, नक्षत्र आणि राशींचा परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्राच्या (Jyotish Shastra) अभ्यासकांचं मत आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रहांचं हे राशिपरिवर्तन (Transit) मानवी जीवनावर परिणाम करणारं असतं. नवग्रहांमध्ये रवी अर्थात सूर्याला (Sun) महत्त्वाचं स्थान आहे. यश, मान-सन्मान, गुरू, प्रशासन, सरकार, पिता या गोष्टी रवीच्या आधिपत्याखाली येतात. आरोग्याच्या (Health) दृष्टीनंदेखील रवी महत्त्वाचा मानला गेला आहे. रवी दर महिन्याला राशिपरिवर्तन करतो. त्यामुळे रवीचं गोचर विशेष महत्त्वाचं ठरतं. 15 जून रोजी रवी शुक्राच्या वृषभ राशीतून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करत आहे. रवीचं हे गोचर 12 पैकी तीन राशींना विशेष लाभदायी ठरणार आहे. याबाबतची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. येत्या नऊ दिवसांनी अर्थात 15 जूनला ग्रहांचा राजा रवी मिथुन (Gemini) या राशीत प्रवेश करत आहे. सध्याचं ग्रहमान बघता, रवीचं हे राशिपरिवर्तन सर्व राशींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. काही राशींना (Zodiac Signs) हे गोचर अनुकूल, तर काही राशींसाठी प्रतिकूल ठरणार आहे. त्यातही वृषभ, सिंह आणि कन्या या राशींसाठी हे गोचर विशेष लाभदायी असेल. या राशींच्या व्यक्तींना नव्या संधी मिळतील, त्यांची आर्थिक प्रगती होईल, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. वृषभ (Taurus) : रवीचं मिथुन राशीतलं गोचर शुक्राच्या वृषभ राशीच्या जातकांसाठी विशेष लाभदायी ठरेल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळतील. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील. केवळ बोलण्यानं कामं पूर्ण होतील. नव्या जॉब ऑफर्स येतील. नोकरीतला बदल प्रगतीसाठी पूरक ठरेल. व्यापाऱ्यांना या कालावधीत विशेष लाभ मिळेल. सिंह (Leo) : रवीचं राशिपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. या कालावधीत उत्पन्न वाढेल. पैसा मिळवण्यासाठी नवे मार्ग सापडतील. अचानक धनलाभ होईल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी सर्वोत्तम आहे. या कालावधीत नवे करार किंवा व्यवहार होतील आणि ते विशेष लाभदायी ठरतील. कन्या (Virgo) : रवीचा मिथुन राशीतला प्रवेश बुधाच्या कन्या राशीच्या जातकांना करिअरसाठी शुभ ठरेल. या कालावधीत नवी नोकरी मिळू शकते. तसंच पदोन्नती आणि पगारवाढीचेदेखील योग आहेत. तुम्ही उत्तम काम कराल आणि लोक तुमचं कौतुक करतील. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. मान-सन्मान वाढेल.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या