Home /News /lifestyle /

Sex करण्यात ग्रीस सर्वात अव्वल देश; पाहा भारताचा कितवा नंबर

Sex करण्यात ग्रीस सर्वात अव्वल देश; पाहा भारताचा कितवा नंबर

लैंगिक संबंधांच्या अनुषंगाने 26 देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं.

अॅथेन्स, 15 फेब्रुवारी :  लैंगिक जीवन (Sex Life) ही खूप खासगी बाब आहे; पण त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याबद्दलची निरीक्षणं नोंदवली जात असतात. कंडोम तयार करणाऱ्या ड्युरेक्स (Durex) या कंपनीनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे. त्यात लैंगिक संबंधांच्या अनुषंगाने 26 देशांमधल्या व्यक्तींबद्दलची निरीक्षणं नोंदवण्यात आली. त्यानुसार, ग्रीस  (Greece) हा लैंगिक संबंधांच्या दृष्टीने सर्वांत सक्रिय देश ठरला आहे. ग्रीसमध्ये सर्वांत जास्त वेळा लैंगिक संबंध ठेवले जात असल्याचं या सर्वेक्षणामध्ये समोर आलं आहे. तिथले 89 टक्के नागरिक आठवड्यातून एकदा तरी लैंगिक संबंध ठेवतात. यानंतर या यादीमध्ये ब्राझीलचा नंबर असून, तेथील 85 टक्के नागरिक आठवड्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवतात, तर रशियामधल्या 80 टक्के नागरिकांनी आठवड्यातून एकदा संबंध ठेवत असल्याचं म्हटलं आहे. या सर्वेक्षणात जगभरातल्या 26 देशांमधल्या 30 हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये ते किती वेळा लैंगिक संबंध ठेवतात, लैंगिक समाधान, लैंगिक आरोग्य आणि आपल्या लैंगिक जोडीदाराबरोबर किती समाधानी आहेत याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली होती. ग्रीक रिपोर्टरनं या सर्वेक्षणाबाबत वृत्त दिलं आहे, हे वाचा - तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? मग तुमचं वजन वाढू शकतं! लैंगिक संबंध हा चांगल्या आरोग्याचा एक अविभाज्य भाग आहे का, या प्रश्नावर 91 टक्के ब्राझिलियन आणि 86 टक्के ग्रीक लोकांनी ठामपणे होकार दिला. लैंगिक समाधान हे सकारात्मक मानसिकता दर्शवत असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. लैंगिक संबंधांचा कालावधी किती असतो, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. ग्रीस आणि नायजेरिया या दोन्ही देशांतल्या नागरिकांचा लैंगिक संबंधांचा कालावधी सरासरी 21 मिनिटं असल्याचं यामधून समोर आलं आहे. नायजेरियन नागरिक लैंगिक जीवनात सर्वांत आनंदी असल्याचंदेखील यामध्ये दिसून आलं आहे. 67 टक्के नायजेरियन नागरिक आपल्या लैंगिक जीवनात समाधानी असल्याचं दिसून आलं आहे. लैंगिक समाधानाच्या बाबतीत ग्रीस पाचव्या क्रमांकावर असून, तिथल्या 54 टक्के नागरिकांनी ते लैंगिक संबंधांमध्ये समाधानी असल्याचं म्हटलं आहे. लैंगिक समाधानाच्या बाबतीत नायजेरिया सर्वांत वरच्या नंबरवर असून, त्यानंतर मेक्सिको, भारत आणि पोलंडचा नंबर आहे. हे वाचा - कोरोना काळातील एकटेपणा दूर करण्यासाठी मंत्री; Minister of Loneliness ची नियुक्ती लैंगिक संबंधांच्या सक्रियतेच्या बाबतीत जपानी नागरिक सर्वांत खालच्या क्रमांकावर आहेत. तिथले केवळ 34 टक्के नागरिक दर आठवड्याला लैंगिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर तिथले केवळ 15 टक्के नागरिक लैंगिक जीवनात समाधानी असल्याचंदेखील समोर आलं आहे. जपानमधले कामाचे तास बरेच असतात. तिथले नागरिक वर्कोहोलिक असल्यामुळे तिथले लोक लैंगिक संबंधांसाठी कमी वेळ देतात. या यादीत अमेरिका जपानच्यावर असून, तिथले 53 टक्के नागरिक आठवड्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं आहे.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Health, Sex

पुढील बातम्या