बीजिंग, 29 मे : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. यासाठी मेकअपशिवाय आता कॉस्मेटिक सर्जरीसारखे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे फक्त तात्पुरतं नाही तर कायमचं सौंदर्य मिळवता येतं. म्हणजे तुम्हाला नाक, ओठ, डोळे, पोट किवा इतर कोणत्या अवयवाचा जसा आकार हवा तसा मिळवता येतो. सध्या भयंकर असा ब्युटी ट्रेंड (beauty trends) समोर आला आहे. ज्यामध्ये पायांचं सौंदर्य वाढवण्याकडे तरुणींचा कल आहे आणि त्यासाठी त्या आपल्या पायाच्या नसाही (Cutting legs nerves) कापून घेत आहेत.
चीनमध्ये (China) काफ ब्लॉकिंग (calf blocking) चर्चेत आहे. पाय सडपातळ दिसण्यासाठी ही सर्जरी केली जाते आहे. यामध्ये पायाच्या मागील भागाच्या काही नसा कापल्या (legs nerves surgery) जातात, सर्जरी करून त्या ब्लॉक केल्या जातात. जेणेकरून तिथं फॅट जमा होणार नाही. यामुळे पाय सडपातळ आणि सरळ दिसतात. त्यांचा आकार कमी होतो.
हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी भयंकर उपाय; त्याने चक्क खाल्ला कच्चा विषारी साप आणि...
द पेपरला दिलेल्या मुलाखतील साऊथर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे (Southern Medical University) डॉक्टर जेंग शुन यांनी सांगितलं की, त्यांना जेव्हा या सर्जरीबाबत पहिल्यांदाच समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. पाय स्लिम दिसावेत यासाठी तरुणी मुद्दामहून पायांच्या नसांना ब्लॉक करत आहेत. ज्या रुग्णांना अशी सर्जरी करावी लागते. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते मार्ग शोधत असता. अशात निरोगी लोग आपल्या नसा खराब करून घेत आहे. पायाची कोणतीच नस उपयोगाची नाही असं नाही. जर त्याला हानी पोहोचली तर ती कधीच बरी होऊ शकत नाही.
चीनमधील गुड डॉक्टर ऑनलाइन या प्रसिद्ध हेल्थ वेबसाईटवरील माहितीनुसार एका तरुणीने अशी सर्जरी केली. गेल्या दोन महिन्यांपासून तिला नीट चालताही येत नाही आहे, असं तिनं सांगितलं. तिच्या पायाचा खालील भाग बधीर झाला आहे आणि पायांवर जास्त वेळ उभं राहणंही अशक्य झालं. तिनं सल्लाशिवायच सर्जरी केली आणि आता ते बरं करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेते आहे.
हे वाचा - Kiss करताना का बंद होतात डोळे? तज्ज्ञांनी उलगडलं 'लिपलॉक' मागील रहस्य
चीनमधील न्यूजपेपरच्या रिपोर्टनुसार काफ ब्लॉक हा ब्युटीसंबंधित इंटरनेट फोरम आणि सोशल मीडिया ग्रुपवर चर्चेत आहे. इथं लोक पायाच्या खालील भाग स्लिम करण्याचा मार्ग सूचवतात. त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याचा विचारही ते करत नाही. तरुणी सुंदर दिसण्याच्या नादात कोणत्याही वैज्ञानिक पुराव्याशिवाय याचा अवलंब करतात. जेव्हा अशा पद्धतीच्या ब्युटी ट्रेंडबाबत माहिती झाली. तेव्हा चीनच्या अनेक ब्युटी ब्लॉगर्स, व्लॉगर्सवर असे ट्रेंड्स प्रमोट करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, China, Health, Lifestyle