मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'बालिका वधू'तील दादी सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक; उपचारासाठी पसरले हात

'बालिका वधू'तील दादी सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक; उपचारासाठी पसरले हात

अभिनेत्री सुरेखा सीकरी (Surekha Sikri) यांनी पुन्हा ब्रेन स्ट्रोक (brain stroke) आला आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही आता चांगली नाही आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 सप्टेंबर : टीव्ही सीरियल बालिका वधूमध्ये दादी सा आणि बधाई हो फिल्ममध्ये दादीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुरेखा सीकरी  (Surekha Sikri) यांना पुन्हा ब्रेन स्ट्रोक आला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने त्यांनी मदत मागितली आहे.

सुरेखा सीकरी यांना आज सकाळी अकराच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेखा यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखा यांची आर्थिक परिस्थितीदेखील सध्या ठिक नाही. उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हात हवा आहे. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांकडे त्यांनी मदत मागितली आहे. आपल्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे वाचा - पत्नी मान्यताने शेअर केला कॅन्सरग्रस्त संजय दत्तचा PHOTO; केली भावुक पोस्ट

सुरेखा सीकरी यांना 2018 सालीदेखील ब्रेन स्ट्रोक आला होता.  सुरेखा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये  हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखातीत या गोष्टीचा खुलासा केला होता. मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "मी बाथरूममध्ये पडले होते. ज्यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली होती. मला ब्रेन स्ट्रोक झाल्यानं मी अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. तब्येत बिघडत गेल्यानं मी शूटिंग करू शकले नाही"

याच कारणामुळे सुरेखा अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्या होत्या.

हे वाचा - "...तर मी कायमची मुंबई सोडून देईन..." - कंगना रणौत

सुरेखा यांना नॅशनल फिल्म अवॉर्डही मिळाले आहेत. 'बधाई हो' सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार. याआधी त्यांना तमस (1988) आणि माम्मो (1995) या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

First published: