२५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी भरू शकतात NEET चा फॉर्म, अर्जाची तारीख वाढली

२५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी भरू शकतात NEET चा फॉर्म, अर्जाची तारीख वाढली

२५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतात असा निर्णय कोर्टाने घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर २०१८-  गेल्या काही दिवसांपासून सुरू असेलेल्या नीट परीक्षेच्या वादावर अखेर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला. २५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतात असा निर्णय कोर्टाने घेतला. मात्र, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, विद्यार्थी- विद्यार्थीनींचे वय सीबीएसईकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या आधारावर ठरवण्यात येईल.

याचबरोबर सुप्रीम कोर्टाने नॅशनल टेस्टिंग एजंन्सीला नीटची अर्ज प्रक्रिया एक आठवडा पुढे ढकलण्यास सांगितली आहे. ७ डिसेंबरपर्यंत विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. सीबीएसईने नीट परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २५ वयोमर्यादा ठरवण्यात आली होती. तर आरक्षणातील विद्यार्थ्यांना ५ वर्ष अधिक देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

एनटीए नीट २०१९ शी निगडीत १० महत्त्वाच्या गोष्टी-

विद्यार्थ्यांना ntaneet.nic.in. वर अर्ज करावा लागेल. नीट २०१९ ची परीक्षा ५ मे २०१९ ला होईल.

परीक्षेची वेळ दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत असेल. ही परीक्षा ७२० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न ४ गुणांचा असेल.

प्रत्येक बरोबर उत्तरावर विद्यार्थ्यांना ४ गुण मिळतील. तर चुकीचं उत्तर दिलं तर एक गुण कमी होईल.

नीट २०१९ चे अडमिट कार्ड १५ एप्रिल २०१९ ला मिळतील.

ही परीक्षा ३ तासांची असेल. नीट २०१९ परीक्षेचा निकाल ५ जून २०१९ ला लागेल.

ज्या मुलांना मधुमेह आहे ते आपल्यासोबत गोळ्या, फळं आणि पारदर्शक पाण्याची बाटली घेऊन येऊ शकतात.

मात्र चॉकलेट, टॉफी आणि सँडविच असे पॅकिंग असलेले पदार्थ परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे.

मराठी, इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, उडिया आणि उर्दू भाषांमध्ये होईल.

VIDEO: रेल्वेखाली आत्महत्या करायला गेलेल्या आईचा मुलीने असा वाचवला जीव

First published: November 30, 2018, 6:56 PM IST

ताज्या बातम्या