अबुजा, 28 डिसेंबर : सुपरहिरो स्पायडर मॅनला (spider man) तसं आपण सर्वांनी फायटिंग (fighting) करताना पाहिलं आहे. फिल्ममध्ये हा स्पायडर मॅन व्हिलनशी लढतो. पण एरवी टीव्हीवर खलनायकांशी फायटिंग करणारा स्पायडर मॅन प्रत्यक्षात मात्र सर्वांच्या लाडक्या, आवडत्या सांता क्लॉजबरोबरच (santa claus) फायटिंग करताना दिसला. स्पायडर मॅन आणि सांता क्लॉज यांच्या या फायटिंगचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला आहे.
डिसेंबर म्हणजे ख्रिसमस आणि ख्रिसमस म्हणजे सांता क्लॉज आला. सर्वत्र ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा झाला. अनेकांना सांता क्लॉजकडून गिफ्टही मिळालं. सर्वांना गिफ्ट देऊन सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा सांता क्लॉज स्पाडर मॅनला भिडला. भररस्त्यात स्पायडर मॅन आणि सांता क्लॉज दोघांचीही मारामारी झाली.
Problem no dey end!!! 😂 😂 😂 pic.twitter.com/RLADCXo05d
— Naija (@Naija_PR) December 9, 2020
हा व्हिडीओ नायजेरियातील असल्याचं सांगितलं जातं आहे. दोन व्यक्तींमध्ये लढाई झाली. त्यापैकी एकानं सांता क्लॉजचा ड्रेस घातला होता तर दुसऱ्या व्यक्तीनं स्पायडर मॅनचा. ट्विटर युझर @Naija_PR हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
हे वाचा - भुकेनं झालं होतं व्याकूळ! खायला मिळताच रडू लागलं कुत्र्याचं पिल्लू; VIDEO VIRAL
दोघंही रस्त्याच्या कडेला एकमेकांना मारहाण करत आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून भांडणं झाली हे माहिती नाही. मात्र तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांचा मात्र चांगलंच मनोरंजन झालं. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच तिथं प्रत्यक्षात ही अनोखी लढाई पाहू न शकणाऱ्यांनाही ती पाहता आली.
हे वाचा - वातावरणाची कमाल; रस्त्यावरच सुरू झालं गाड्यांचं स्केटिंग
बरं आता ही ढिशूम ढिशूम तर झाली. पण दोघांमध्ये कोण जिंकलं असा प्रश्नही पडतोच. तर सोशल मीडियावर सांता क्लॉजला विजेता घोषित करण्यात आलं आहे. व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर दिसून येईल की शेवटी सांता क्लॉज स्पायडर मॅनला अखेर खाली पाडतोच. त्याच्या छातीवर बसतो आणि त्याला दे दणादण देतो. स्पायडर मॅनही तेव्हा काहीच करू शकत नाही. तो आपली हार मानतो आणि सांता क्लॉज त्याला सोडून देतो. जमिनीवर पडलेला स्पायडर मॅनही लगेच उठतो. त्यानंतर दोघंही एकमेकांकडे पुन्हा पाहतात आणि सांता क्लॉज पुन्हा भडकतो. तो पुन्हा स्पाडर मॅनकडे धावून जातो. पण सांता क्लॉजचा मार खाऊन घाबरलेला स्पायडर मॅन मात्र तिथूनं धूम ठोकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos