Home /News /lifestyle /

Superfood For Women : महिलांना अनेक समस्यांपासून मुक्त करू शकतो साबुदाणा, वाचा चमत्कारिक फायदे

Superfood For Women : महिलांना अनेक समस्यांपासून मुक्त करू शकतो साबुदाणा, वाचा चमत्कारिक फायदे

शुक्रवारी म्हणजेच 17 जूनला संकष्ट चतुर्थी आहे. उपवासाच्या दिवशी आपण एक विशिष्ठ पदार्थ आवर्जून खातो आणि तो म्हणजे साबुदाणा.

  मुंबई, 17 जून : भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) व्रत वैकल्यांना खूप महत्व आहे. आपल्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणून उपवास (Fast) केले जातात आणि देवदेवतांची आराधना केली जाते. काही उपवास आपण नियमितपणे करतो. जसे की, एकादशी, संकष्ट चतुर्थी. येत्या शुक्रवारी म्हणजेच 17 जूनला संकष्ट चतुर्थी आहे. उपवासाच्या दिवशी आपण एक विशिष्ठ पदार्थ आवर्जून खातो आणि तो म्हणजे साबुदाणा. उपवासाला केवळ कंदमुळे खातात. त्यामुळे आपल्याकडे साबुदाणा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. मात्र उपवासाला भूक भागवण्याव्यतिरिक्तही साबुदाणा (Sago Eating In Fast) खाण्याचे आणखी काही फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा खाणे महिलांसाठी कसे फायदेशीर ठरू शकते याबद्दल माहिती देणार आहोत.

  Pune : अडीच लाखांचा केक कधी खाल्लाय का? पुण्यात तयार होणाऱ्या या महागड्या केकचा, पहा VIDEO

  उपवासाच्या दिवशी बनणाऱ्या साबुदाण्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची, नारळ, तूप असे सर्व घटक असतात. यामुळे साबुदाणा सर्वानाच खूप आवडतो. त्याचसोबत यामध्ये फिनोलिक कंपोनंट आणि अँटिऑक्सिडंट देखील असतात. साबुदाणा आपल्या जिभेचे टेस्ट बड्स उत्तेजित करतो आणि आपल्याला भूक लागते. त्याचबरोबर साबुदाणाची एक वाटी तुम्हाला फ्लू आणि तापेपासून बरे होण्यास मदत करते. साबुदाणा खाण्याचा आणखी एक महत्वाचं फायदा म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होताना आणि एंडोमेट्रिओसिसदरम्यान जास्त रक्तस्त्राव होत नाही. साबुदाणा खाण्याच्या फायद्यांबद्दल न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून सखोल माहिती दिली आहे.

  घरात Cockroaches पाळण्यासाठी कंपनी देतेय दीड लाख रुपये; तुम्हाला मान्य आहे का ही विचित्र ऑफर?

  ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. त्यांना उपचार सुरु असताना साबुदाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे जे लोक पुढील काळासाठी आपली अंडी गोठवण्याची योजना करत आहेत. त्यांच्यासाठी साबुदाणा खाणे फायद्याचे असते. मासिक पाळीपूर्वी तुम्हाला डोकेदुखी/अत्यंत थकवा येत असेल तेव्हाही साबुदाणा खावा. ज्या स्त्रियांना ओव्हुलेशनच्याच्या काळात स्पॉटिंग दिसते त्यांनीही ओव्ह्युलेशनच्या काळात एक वाटी साबुदाणा खावा. मासिक पाळीदरम्यान जेव्हा भूक लागत नाही. किंवा पोटाचा त्रास होतो तेव्हा एक वाटी साबुदाणा तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Superfood

  पुढील बातम्या