मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sunday Special : 9 जन्मांक असलेले लोक कसे असतात? जाणून घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी

Sunday Special : 9 जन्मांक असलेले लोक कसे असतात? जाणून घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी

#नंबर 9 : तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होत

#नंबर 9 : तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होत

#नंबर 9 : तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होत

नवी दिल्ली, 5 जून : नऊ क्रमांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीदेखील पूर्णपणे मंगळाच्या प्रभावाखाली असतात. अगदी हुशार आणि मानवतावादी असे हे लोक असतात. या व्यक्तींना आयुष्यात सुरुवातीला बरेच खोटे मुखवटे घातलेले लोक भेटतात. त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. नैसर्गिकरित्या या व्यक्तींमध्ये चांगले एंटरटेनर आणि परफॉर्मर दडलेले असतात. मात्र, यांच्या आयुष्यात बरेच चढ-उतारही पहायला मिळतात.

आयुष्यात काही वेळा अशा येतात जेव्हा ओळखीची प्रत्येक व्यक्ती या लोकांसोबत उभी असते; तर काही वेळा अशाही येतात जेव्हा आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विरुद्ध उभी असते. एखाद्या श्रीमंत घरात जन्म झाल्यास, या व्यक्तींना तेवढा त्रास सहन करावा लागत नाही. मात्र, इतरांना यातून आजिबात सुटका नाही.

नऊ जन्मांकाच्या व्यक्ती भरपूर महत्त्वाकांक्षी असतात. इतरांपेक्षा अधिक उच्च पद मिळवल्याशिवाय हे लोक शांत बसत नाहीत. मॅनेजमेंट आणि प्रशासकीय कामांमध्ये या व्यक्तींचा हात कोणीही धरू शकत नाही. लाँग टर्मसाठी घातक असणारी, मात्र रोमांचक अशी नोकरी या व्यक्ती स्वीकारतात. या व्यक्तींना जुगाराचं व्यसन लागण्याची शक्यता असते. त्यांच्या हट्टी आणि हुकूमशाही स्वभावामुळे त्यांचे अनेक हितशत्रू तयार होतात. या व्यक्तींना खर्चावर नियंत्रण ठेऊन भविष्यासाठी बचत करण्याची सवय लावून घेणं आवश्यक असतं. सरकारी काम, शिक्षण, ट्रेनिंग, गॅस वाहिन्या, मेटल, ब्रिक्स, लँड, मशिनरी, स्टोन, ग्लॅमर, मीडिया, एचआर अशा क्षेत्रांमधील व्यवसाय नऊ जन्मांकांच्या व्यक्तींसाठी भाग्याचे ठरतात.

नऊ जन्मांक असलेल्या व्यक्तींनी पाकिटात वा बॅगमध्ये लाल कापड ठेवणं फायद्याचं ठरेल. भगवान शंकर आणि हनुमानाच्या मंदिरांमध्ये प्रत्येक मंगळवारी सकाळी पूजा किंवा अभिषेक करणं या व्यक्तींचं नशीब चमकवू शकेल. या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कृपया मांसाहार, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थ आणि चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. मनगटावर लाल धागा बांधणं उत्तम.

शुभ रंग : लाल आणि केशरी (Red and Orange)

शुभ दिन : मंगळवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया गरिबांना लाल मसूर डाळ दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होत?

First published:

Tags: Numerology