उन्हाळ्यात पेस्टल रंगांचा हा पर्याय एकदा वापरून पाहाच

उन्हाळ्यात पेस्टल रंगांचा हा पर्याय एकदा वापरून पाहाच

महाराष्ट्रातून हिवाळा आता कमी झाला असून, उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता हिवाळ्याच्या कपड्यांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च- महाराष्ट्रातून हिवाळा आता कमी झाला असून, उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता हिवाळ्याच्या कपड्यांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूप्रमाणे फॅशनमध्येही बदल करून आपण इतरांच्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात, साध्या उन्हातही घामाच्या धारा सुरु होतात. त्यात जाड कापडाचे कपडे असतील तर अंगाची अक्षरशः लाही-लाही होते. त्यात दुपारचा उकाडा तर सहन होण्यापलीकडे असतो. अशामध्ये आजच्या तरुणाला कोणत्याही ऋतूमधील फॅशनसाठी तयार असलं पाहिजे.स्पायकर लाइफस्टाइलने उन्हाळा लक्षात घेता विशेष पेस्टल कपडे तयार केले आहेत. यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा कूल राहण्यास मदत होईल.


पेस्टल रंगाचे कपडे कसे वापरावे यासाठी काही टीप्स-

जर तुम्ही पेस्टल रंग वापरण्यासाठी कम्फर्टेबल नसाल, तर तुम्ही सामान्य रंग आणि पेस्टल रंगाच्या कपड्यांचं कॉम्बिनेशन वापरू शकता. सामान्य रंग अधिक लक्ष वेधून घेतो त्यामुळे पेस्टल रंगामध्ये तुम्हाला ऑकवर्ड वाटणार नाही. स्पायकरचे पेस्टल रंग सौम्य असतात. डार्क रंगापेक्षा अधिक व्हेरायटी तुम्हाला पेस्टल रंगांमध्ये मिळेल. यामुळे तुम्ही फिकट रंगांचं ड्रेसिंग करताना कोणता शर्ट आणि पॅन्ट कोणत्या रंगाची वापरायची असा प्रश्न सहसा पडत नाही.स्पायकरच्या मुख्य पेस्टल्स रंगामध्ये अनेक उप-रंग येतात. निऑन गुलाबी शर्ट अनेकदा ट्रेंडमध्ये असतो. पेस्टल्स रंग आणि फॅब्रिक अधिक सौम्य असल्याने ते विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये आणि कोणत्याही स्किन टोनला जुळणारे असतात.


स्किन टोनचे प्रकार-

प्रत्येकाची त्वचा आणि त्वचेचा रंग वेगवेगळा असतो. यात गडद आणि उजळ असे वेगवेगळे प्रकार असतात. या त्वचेच्या टोननुसार पेस्टल रंगाची निवड करणं गरजेचं असतं.

लाइट स्किन टोन-

याचा मुख्य रंग आयवरी असून, अंतरंगातील स्किनटोन निळा किंवा गुलाबी असतो. केसांचा रंग सोनेरी किंवा तपकिरी रंगांचा असतो. तसेच निळ्या, राखाडी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात. मुख्यत्वे कॉकेशिअनमध्ये अशा प्रकारची लोक आढळतात.


मीडियम स्किन टोन

आशिया, लॅटिनोस किंवा भूमध्यसागरीय लोकांचे स्किनटोन अशा प्रकाचे असते. केसांचा रंग काळा, तपकिरी आणि लाल रंग मिश्रित असतो. हॅझेल, तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात.

डार्क स्किन टोन

तपकिरी आणि ब्राऊन रंगामध्ये अनेक शेड स्किनचे वरील भाग तर लाल किंवा निळा रंग त्वचेच्या अंतरंगात असते. अश्या प्रकारचे स्किन टोन सामान्यतः आफ्रिकन आणि भारतीय लोकांमध्ये आढळते. केसांचा रंग सामान्यतः काळा किंवा गडद तपकिरी असतो. डोळे सामान्यतः तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात.

VIDEO : लोकसभा का लढवायची नाही? राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 06:45 AM IST

ताज्या बातम्या