कडक उन्हाळ्यातही राहा ताजेतवाने, करा हे घरगुती उपाय
सध्या सगळीकडे एकदम कडक उन्हाळा सुरू झालाय. उन्हाळ्यात आपल्याला घराबाहेर तर पडावं लागतंच. अशा वेळी तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल यासाठी काही टिप्स

सध्या सगळीकडे एकदम कडक उन्हाळा सुरू झालाय. उन्हाळ्यात आपल्याला घराबाहेर तर पडावं लागतंच. अशा वेळी तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल यासाठी काही टिप्स

उन्हाळ्यात घरच्या घरी तुम्ही तुमच्या सौंदर्याची काळजी घेऊ शकाल. तुम्ही घरीच साॅल्ट स्पा करा. म्हणजे मिठानं शरीराला मसाज. बाजारात स्पासाठी वेगवेगळं साॅल्ट म्हणजे मीठ मिळतं. अगदी सैंधवापासून अरोमा मीठापर्यंत उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही पपई, दही मिक्स करा. मग अख्ख्या शरीराला मसाज करून घ्या.

उन्हाळ्यात केसात कोंडा होण्याची समस्या जास्त दिसते. त्याचा उपाय म्हणजे रात्री मेथीचे दाणे भिजत टाका. दुसऱ्या दिवशी ते मिक्सरमधून बारीक करून ती पूड केसाला आणि डोक्याच्या त्वचेला लावा.

केसाला दह्यानं मसाज करा. दर दोन दिवसांनी शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. केस धुण्याआधी तेलानं मसाज करा.

उन्हाळ्यात चेहरा मलूल पडतो. त्वचा उजळावी म्हणून ओटमिलमध्ये किसलेली काकडी आणि दही एकत्र करून तो मास्क चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानं मास्क सुकला की चेहरा धुऊन घ्या.

चेहऱ्यावर डाग असतील तर हळद, साय आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्याला लावा. हे नियमित केलंत तर तुम्हाला लगेच फरक दिसेल.

उन्हाळ्यात चेहरा टवटवीत दिसावा यासाठी छोटे उपाय मोठी कामगिरी करतात. तुम्ही मुलतानी माती, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा. उन्हाळ्यात खूप थंडही वाटेल.
First Published: Mar 26, 2019 12:58 PM IST