मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Summer Hair Care: उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

Summer Hair Care: उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

Hair care tips: उन्हाळ्यात केस खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर थेट सूर्य किरणांपासून केसांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणत्‍या टिप्स महत्त्वाच्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

Hair care tips: उन्हाळ्यात केस खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर थेट सूर्य किरणांपासून केसांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणत्‍या टिप्स महत्त्वाच्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

Hair care tips: उन्हाळ्यात केस खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर थेट सूर्य किरणांपासून केसांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणत्‍या टिप्स महत्त्वाच्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे केसांच्या मुळांमध्ये बुरशी आणि खाज सुटण्याची समस्या वाढते. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला (Summer Hair Care Tips) लागतात.

अशा परिस्थितीत उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात केस खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर थेट सूर्य किरणांपासून केसांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याशिवाय केसांना कमकुवत आणि निस्तेज होण्यापासून रोखण्यासाठी केसांची काळजी घेण्याच्या खास टिप्स पाळल्या पाहिजेत. उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणत्‍या टिप्स महत्त्वाच्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

या टिप्स फॉलो करा -

स्कार्फ किंवा टोपी वापरा -

उन्हाळ्यात कडक उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी किंवा मोठी हॅट वापरा. हा सोपा उपाय केल्याने आपले केस सूर्यकिरणांच्या थेट अतिनील किरणांपासून सुरक्षित राहतील आणि केसांचे कमीत कमी नुकसान होईल.

केसांच्या स्वच्छतेची काळजी घ्या -

सूर्यप्रकाशामुळे केसांमध्ये घाम येण्याची समस्या कॉमन आहे. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर केस धुणे, अंघोळ करणे हा चांगला उपाय आहे. असं केल्यानं घामासोबत बॅक्टेरियाही बाहेर पडतात. मात्र, प्रत्येक वेळी अंघोळ करताना केसांना शॅम्पू करण्याची आवश्यकता नाही अन्यथा केस कोरडे होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी शॅम्पू वापरण्याऐवजी फक्त पाण्याने केस धुवा.

कंडिशनरचा वापर -

जेव्हा आपण केस शॅम्पू करतो तेव्हा कंडिशनर करायला विसरू नका. केसांना कंडिशनर वापरल्याने केसांमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि केस तुटत नाहीत. तसेच घामामुळे कोरडे झालेले केस पुन्हा मऊ होतील.

हे वाचा - भारतात Omicron BA.4 चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ; किती घातक आहे हा स्ट्रेन?

केस ट्रिम करणे -

काही महिन्यांच्या अंतरानंतर आपले केस नियमितपणे ट्रिम करा. असे केल्याने निस्तेज आणि दुतोंडी केसांचा प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे केसांची वाढ देखील चांगली होईल.

हेअर पॅक आवश्यक -

उन्हाळ्यात शक्यतो दही, अंडी इत्यादी नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेले हेअर पॅक लावा. त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा राहत नाही आणि केस मजबूत राहतात. स्टाइलिंग हीटिंग टूल्स शक्य तितक्या कमी वापरा.

हे वाचा -  Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला

ब्लो ड्रायरचा वापर कमी -

ओले केस उन्हाळ्यात शक्यतो नैसर्गिकरित्या कोरडे होऊन देणे चांगले आहे. याशिवाय स्टायलिंगसाठी स्ट्रेटनर आणि ब्लोअरचा वापर कमीत कमी करा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Beauty tips, Health, Summer season, Woman hair