घरच्या घरी असे बनवा उन्हाळ्यातील पेय

जाणून घेऊया कशा पद्धतीने हे थंड पेय आपण घरच्याघरी तयार करू शकतो

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2017 08:46 PM IST

घरच्या घरी असे बनवा उन्हाळ्यातील पेय

ऊन्हाळा सुरू झाला आहे, आणि याच ऊन्हाळ्याच्या झळा सगळ्यांनाच जाणवायला लागल्या आहेत. उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी फक्त थंड पाणी आणि थंड शितपेय यावरच अवलंबून राहणेही प्रकृती योग्य नाही.  घरी बनवलेल्या थंडगार आणि संपूर्ण दिवसभर आपली प्रतिकारक क्षमता टिकवून ठेवणाऱ्या थंडपेय कित्येक पटीने उत्तम असते. यामुळे आपले शरीर लू आणि डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करायला तयार होते. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने हे थंडगार पेय आपण घरच्याघरी तयार करू शकतो...

 

  कोरफड रस...

कोरफड रस चवीला तुरट असली तरी, या रसात डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. आपल्या शरीराला थंडावा देण्याव्यतिरिक्त कोरफड रस हा आपल्या त्वचेचा ग्लो कायम राखण्यास मदत करतो. कोरफडाच्या पानांचा गर काढताना, त्यावरील पिवळ्या रंगाचा थर काढुन टाका कारण यामुळे कोरफड रस हा कडवट होण्याची शक्यता असते. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर, त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापद्धतीने वाटुन घ्यावा. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे.

Loading...

    दही शेक...

दहीमध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.

   अमर बेल रस...

अमरबेलाच सरबत उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देतो. सगळ्यात आधी अमरबेल मधील साऱ्या बिया काढून त्याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. त्यानंतर या ज्युसला चांगल्या पद्धतीने फिल्टर करुन घेऊन त्यामध्ये चाट मसाला घालून, अमरबेल पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.

    

    कैरी पन्हे...

कैरी खाण्यास जेवढी रुचकर आणि तोंडाला पाणी आणणारी आहे, तेवढीच कैरीच पन्हे हे आपल्याला लू पासून बचावते. कैरीच पन्हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी कैरीला चांगल्या पद्धतीने सोलून त्यामधील कोय काढुन त्याला गरम पाण्यात उकळुन घ्या. त्यानंतर यामध्ये काळ मीठ, चाट मसाला, पुदिना आणि साखर घालुन मिक्सर मध्ये त्याचा ज्युस करुन, एका ग्लासात बर्फाचे तुकडे घालून कैरी पन्हं पिण्यास तयार....

   पुदिना रस...

पुदिन्याच सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन आणि लू पासुन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ,

मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी मात्रा असलेल्या पाण्यात मिक्स करुन पुदिना पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...