summer drink recipe असा बनवा घरच्या घरी चविष्ट पौष्टिक आणि थंडगार बदाम शेक

summer drink recipe असा बनवा घरच्या घरी चविष्ट पौष्टिक आणि थंडगार बदाम शेक

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेवर मात करायची असेल तर विविध थंड पेयं मस्ट आहेत. हा शेक नक्की ट्राय करा.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : बदलत्या ऋतूमध्ये (changing seasons) बदाम शेक (almond milk) पिण्याची गोष्टच काही और असते. बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच त्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. बदाम मेंदू तल्लख बनवतो. (recipe news)

तसं तर बदाम विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र बदाम शेक ही एक सोपी रेसिपी आहे. या स्वादिष्ट बदाम शेकमध्ये तुम्हाला विलायची, केशर आणि मलईची चव मिळेल. जाणून घ्या याची सोपी रेसिपी. (summer healthy drink)

साहित्य

20-30 बदाम

साडेतीन कप दूध

3 टेबलस्पून लो कॅलरी स्वीटनर

1/4 टीस्पून हिरव्या वेलचीची पूड

दीड टीस्पून कस्टर्ड पावडर

एक चिमूट केसर

पाव कप ताजी मलई

कृती

बदाम शेक बनवण्यासाठी सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये 2 कप दूध गरम करा. यात लो कॅलरी स्वीटनर, हिरव्या वेलचीची पावडर आणि कस्टर्ड पावडर टाका. या मिश्रणाला 10-15 मिनिटांसाठी कमी आचेवर उकळा. मध्येमध्ये हलवत रहा. (summer badam shake recipe)

हेही वाचा Health tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून (summer cool shake recipe)खा, नक्की दिसेल परिणाम

यादरम्यान एका ब्लेंडरमध्ये बदाम टाका. उरलेल्या दुधात मऊ पेस्ट मिसळा. वाटलेली पेस्ट दुधातल्या मिश्रणात मिसळा. (how to make badam shake)

याला 5 मिनिट कमी आचेवर उकळा. आता यात केशर टाका. एक मिनिट शिजवा. यात ताजी मलाई टाकून मिसळा. (almond shake recipe)

हेही वाचा महिला कोणत्या गोष्टीवर करतात सर्वाधिक चर्चा, सर्वेक्षणातून आलं समोर

पॅन गॅसवरून काढा. या मिश्रणाला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा. थंड झाल्यावर सर्व्हिंग ग्लासात काढून वेलची पावडर आणि केशर टाकून सजवा.

Published by: News18 Desk
First published: March 8, 2021, 8:21 AM IST

ताज्या बातम्या