मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केस आणि स्कीन केअरसाठी उसाचा रस असा वापरून बघा; परिणाम तुम्ही स्वत: पाहाल

केस आणि स्कीन केअरसाठी उसाचा रस असा वापरून बघा; परिणाम तुम्ही स्वत: पाहाल

केस आणि स्कीन केअरसाठी ऊसाचा रस

केस आणि स्कीन केअरसाठी ऊसाचा रस

केसांचे आरोग्य आणि स्कीन केअरसाठीही उसाचा रस फायदेशीर आहे, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. उसाच्या रसाचा वापर आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही उत्तम ठरू शकतो. याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 नोव्हेंबर : उसाच्या रस पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोषक तत्वांनी युक्त उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतो. केसांचे आरोग्य आणि स्कीन केअरसाठीही उसाचा रस फायदेशीर आहे, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. उसाच्या रसाचा वापर आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही उत्तम ठरू शकतो. याविषयी जाणून घेऊया.

उसाचा रस कार्बोहायड्रेट, खनिजे, प्रथिने, लोह, जस्त, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे निरोगी केस आणि स्कीन केअरसाठी ऊसाचा रस लावणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी उसाच्या रसाचा उपयोग कसा होतो. पण, त्वचा आणि केसांवर थेट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत जरूर घ्या.

उसाचा रस केस आणि त्वचेसाठी फायदेशीर -

मुरुमे/ पिंपल्स घालवा -

उसाचा रस त्वचेला बॅक्टेरियापासून मुक्त करून त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. उसाचा रस हंगामात नियमित प्यायल्याने त्वचेवरील मुरुमे आणि पुरळ कमी होऊ लागतात. दुसरीकडे, मुलतानी मातीमध्ये उसाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स आणि मुरुमे कमी होतात.

तरुण त्वचेसाठी -

अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स घटकांनी समृद्ध उसाचा रस, त्वचेचे मुक्त रॅडिकल्स कमी करून खराब झालेल्या त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतो. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ लागतात. यासाठी उसाचा रस थेट चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

काळे डाग कमी होतील -

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी उसाच्या रसाचा वापरही उत्तम ठरू शकतो. उसाच्या रसामध्ये असलेले ग्लायकोलिक ऍसिड त्वचेला एक्सफोलिएट करून काळे डाग कमी करण्यास मदत करते. यासाठी उसाचा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर चेहरा धुवा.

केसांच्या वाढीसाठी उपयुक्त -

पोषक तत्वांनी युक्त उसाचा रस केसांना खोल कंडिशनिंग करून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. उसाचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्यास डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यासोबतच केसांच्या वाढीलाही वेग येतो. यापद्धतीने उसाचा रस नियमितपणे केसांवर लावल्याने केस लांब, दाट, मुलायम आणि कोंडामुक्त राखता येतात.

हे वाचा - शरीरातील ऊर्जा कमी करतात ‘या’ 5 गोष्टी; लगेच रुटीनमध्ये करा बदल

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Skin, Skin care, Woman hair