• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • काय म्हणता! चिकन खा; मस्त लागेल रात्रीची झोप; झोपेच्या समस्येसाठी 5 उपाय नक्की करून पाहा

काय म्हणता! चिकन खा; मस्त लागेल रात्रीची झोप; झोपेच्या समस्येसाठी 5 उपाय नक्की करून पाहा

Foods For Good Sleep: झोप नीट न येणं अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकतं. या गोष्टी खाल तर समस्या सुटू शकते.

 • Share this:
  मुंबई, 27 फेब्रुवारी : अंथरुणावर पडल्या-पडल्या लगेच झोप येणं हे एखाद्या वरदानाहून कमी नाही. मात्र आजच्या धकाधकीच्या काळात असे असंख्य लोक आहेत जे रात्री खूप वेळ लवकर झोप न आल्यानं वैतागलेले असतात. (sleep disorder) झोपेची कमतरता अनेक कारणांनी असू शकते. (lack of sleep and stress) जसं की, ताण, खूप प्रकाशाच्या संपर्कात येणं, चहा किंवा कॉफीचं सेवन. मात्र काही असे खाद्यपदार्थही आहेत, जे तुमच्या झोपेतला अडथळा दूर करतात. (What to eat for better sleep) झोप येत नसेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा. (food to get rid of sleep problems) हळदीचं दूध हळदीचं दूध झोप येण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतं. हे दूध पिल्यानं मन शांत होतं. यातून झोपही शांत लागते. या दुधात असे गुण असतात, जे ताणातून मुक्त करतात. त्यामुळे झोप येण्यास मदत होते. हेही वाचा  कामाच्या ठिकाणी हवंय चांगलं इम्प्रेशन? नियमित करा या 4 गोष्टी चिकन मांसाहारी गोष्टींमध्ये जास्त ट्रिप्टोफॅन असतं. हे एक आवश्यक अमिनो ऍसिड आहे. हे अमिनो ऍसिड झोपण्यात मदत करतं. चिकन आणि टर्की हे दोन्ही प्रथिनांचे महत्त्वाचे स्रोत आहेत. आता तुम्ही समजू शकाल, की मांसाहार केल्यावर तुम्हाला थकल्यासारखं आणि जड का वाटतं. हेही वाचा किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना, आहारात करा 'हे' बदल पांढरा तांदूळ कर्बोदकांनी भरपूर असलेले पांढरे तांदूळ झोप येण्यास मदत करतात. संशोधन सांगत, की झोपण्याआधी एक तासापूर्वी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन केलं, तर झोप चांगली येते. एका अभ्यासात आढळलं, की जास्त तांदूळ खाणारे लोक चांगली झोप घेऊ शकतात. कॅमोमाईल टी मधाच्या रंगाच्या कॅमोमाईल चहामध्ये एपिगेनिन असतं. हे झोपेला चालना देण्यास मदत करतं. एपिगेनिन मेंदूतील काही रिसेप्टर्सना सक्रिय करतं. हे ताण कमी करतं ज्यातून झोप लवकर येते. कॅमोमाईल टी पिणाऱ्यांमध्ये झोपेची गुणवत्ताही सुधारलेली दिसली. हेही वाचा Organic Skincare किती फायदेशीर? जाणून त्याचे 5 गैरसमज! केळी केळ्यातही ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड खूप प्रमाणात आढळतं. एका मध्यम आकाराच्या केळ्यात ११ मिलिग्रॅम ट्रिप्टोफॅन आढळतं. सोबतच यात मॅग्नेशियमही  असतं. हे दोन पोषकतत्त्व तुम्हाला झोपण्यास मदत करतात. मॅग्नेशियम शरीरात एका शांत तंत्राला चालना देतं.
  Published by:News18 Desk
  First published: