मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कित्येक तास काम करून दुखू लागले हात; 8 व्यायाम वेदनांपासून देतील आराम

कित्येक तास काम करून दुखू लागले हात; 8 व्यायाम वेदनांपासून देतील आराम

कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइल वापरताना हातांवर ताण होतो. अशावेळी अगदी मनगटपासून ते खांद्यापर्यंत करता येतील असे सहजसोपे व्यायाम.

कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइल वापरताना हातांवर ताण होतो. अशावेळी अगदी मनगटपासून ते खांद्यापर्यंत करता येतील असे सहजसोपे व्यायाम.

कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइल वापरताना हातांवर ताण होतो. अशावेळी अगदी मनगटपासून ते खांद्यापर्यंत करता येतील असे सहजसोपे व्यायाम.

  • myupchar
  • Last Updated :
नित्यक्रमात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्यामध्ये हात वापरले जात नाहीत. प्रत्येक लहान मोठी कामे करण्यासाठी हात आवश्यक आहे. हेच कारण आहे की हाताचा जास्त वापर केल्याने कधीकधी मनगट, खांदा किंवा हातामध्ये वेदना होते. बर्‍याच वेळा दीर्घ काळासाठी एकाच स्थितीत मोबाईलचा वापर केल्याने हातांच्या मनगटात वेदना होऊ लगतात. हात दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी काही व्यायाम करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ या हलक्या व्यायामाबद्दल - मनगटाचे व्यायाम
  • मनगटाच्या पहिल्या व्यायामामध्ये आपले हात एका टेबलावर ठेवा. आता काठावरून आपले हात लटकवा. मग आपले मनगट वरती खाली करत रहा. हा व्यायाम आलटून-पालटून दोन्ही हातांच्या मनगटांसह करा.
  •  दुसर्‍या व्यायामामध्ये आपले हात टेबलावर ठेवा आणि काठावरून आपले हात लटकते ठेवा, आता आपल्या मनगटाला उजवीकडे थोडा फिरवा. मग थोड्या वेळासाठी डावीकडे फिरवा.
  • मनगटाच्या तिसर्‍या व्यायामामध्ये आपले दोन्ही हात टेबलावर ठेवा. तळहाताचे हे खालच्या दिशेने असले पाहिजे. यानंतर, आपला हात करंगळी कडून हलवा. मग आपला तळवा अंगठ्याकडे हलवा. ही प्रक्रिया 8 ते 10 वेळा पुन्हा करा, यामुळे बोटांचा आणि मनगटांचा चांगला व्यायाम होतो.
हातासाठी व्यायाम
  • मनगट ते कोपर या भागास हात म्हणतात. हाताच्या व्यायामासाठी, कोपर आपल्याकडे वाकवून आपल्या दिशेने दाबा. नंतर आपला हात, तळवा काही काळ वरच्या दिशेने वळवा, मग तळवा पुन्हा जमिनीच्या दिशेने करा. ही प्रक्रिया 8 ते 10 वेळा वारंवार करा. हे हाताला चांगला व्यायाम देते.
कोपराचा व्यायाम myupchar.comशी संबंधीत एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, मनगटात दुखणं ही एक सामान्य समस्या आहे. कोणतंही काम करतेवेळी कोपरावरही ताण येतोच, म्हणून कोपराचा व्यायाम करणे आवश्यक आहे. कोपराच्या व्यायामासाठी, कोपर सरळ ठेवा आणि बाहू आपल्या दिशेने ठेवा आणि खाली ठेवा. मग कोपर वाकवून आपल्या हातांनी खांद्याला स्पर्श करा. दोन्ही हातांनी कोपऱ्याचा हा व्यायाम 8 ते 10 वेळा करा. खांद्याचा व्यायाम
  • myupchar.com शी संबंधीत डॉ. पल्लवी धवन यांच्या म्हणण्यानुसार, स्नायूंचे दुखणे आणि त्यावरील तणाव कमी करण्यासाठी खांद्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. हे खांद्यांमध्ये लवचिकता आणते.
  • तळवे आतल्या बाजूने वळवून हात तुमच्या स्वतः च्या बाजूस ठेवा. यानंतर, कोपर सरळ आणि हात शरीराच्या समोर आणि वरच्या दिशेने ठेवा. हळू हळू आपले हात पसरवा पुन्हा खाली आणा. खांद्यांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे खांदा दुखणे देखील बरे होते.
  • खांद्यांच्या दुसर्‍या व्यायामामध्ये हात खाली ठेवा आणि हळू हळू हाताने गोलाकार आकार बनवा. नंतर थोड्या वेळासाठी हात पुढच्या बाजूस फिरवा, आणि मग मागील बाजूस फिरवा. दिवसातून किमान तीन वेळा हा व्यायाम करा. ही क्रिया करतेवेळी हातांवर जास्त जोर पडणार नाही याची काळजी घ्या. या व्यायामाचा नियमित अभ्यास केल्यास खांदा दुखणे आणि कडक होणे दूर होते.
  • खांद्यांचा आणखी एक सोपा व्यायाम आहे. यात हात सरळ ठेवा, नंतर एका बाजूचे हात संपूर्ण समोर गोल फिरवा, नंतर मागचा बाजूने गोल फिरवा. मग तीच प्रक्रिया दुसर्‍या हाताने करा. हे खांद्यांना भरपूर आराम देते.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - अंगदुखी न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Lifestyle, Pain

पुढील बातम्या