लग्नमंडपातून अचानक नवरदेव झाला गायब; नवरीने वऱ्हाड्यांमधूनच केली एकाची निवड

लग्नमंडपातून अचानक नवरदेव झाला गायब; नवरीने वऱ्हाड्यांमधूनच केली एकाची निवड

आतापर्यंतच्या अनोख्या लग्नांपैकी हे एक लग्न आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल

  • Share this:

चिकमगलुरु, 7 जानेवारी : कर्नाटकातील (karnatak) चिकमगलुरु जिल्ह्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नवरीने जे पाऊल उचललं ते पाहून अनेकजण चाट झाले. येथे लग्नाच्या दिवशीच नवरदेव गपचूप आपल्या प्रेयसीबरोबर सोहळा सोडून पळाला. यानंतर नवरीने लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांपैकी एकासोबत लग्न केलं. आता या घटनेनंतर नवरीची मोठी चर्चा सुरू आहे. (bridegroom disappeared from his own wedding)

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चिकमगलुरु जिल्ह्यातील तरिकेरे तालुक्यातील आहे. येथे राहणारे दोन भाऊ अशोक आणि नवीन यांचं रविवारी लग्न ठरलं होतं. नवीनने आपली होणारी पत्नी सिंधूसोबत लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मात्र लग्नाच्या दिवशी नवीन अचानक गायब झाला. त्यानंतर समोर आलेल्या बातमीमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार नवीनच्या प्रेयसीने लग्नसोहळ्यात विष खाण्याची धमकी दिली. यामुळे घाबरुन नवीन प्रेयसीसोबत तुमाकुरुला पळून गेला.(bridegroom disappeared from his own wedding)

हे ही वाचा-साधू महाराज रॉक्स पब्लिक शॉक्स! रॉक संगितावर साधू महाराजांचे देशी ठुमके

एका स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीनुसार लग्नाच्या दिवशी नवीनचा भाऊ अशोक याचं लग्न तर झालं, मात्र सिंधूचं कुटुंबीय चिंतेत होतं. यानंतर सिंधूनेही तेथेच लग्न करण्याचं ठरवलं. आणि लग्न मंडपातच मुलं शोधायला सुरुवात केली. विशेष म्हणजे मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी चंद्रप्पा नावाच्या एका मुलाची निवड केली. सांगितलं जात आहे की, चंद्रप्पा BMTC मध्ये कंडक्टर आहे आणि तो सिंधूसोबत लग्न करायला तयार झाला.  (bridegroom disappeared from his own wedding) चंद्रप्पाने लग्नाच्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम पाहिला होता. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांच्या परवानगीने लग्न केलं. सिंधूने पसंत केल्यानंतर ते त्याच लग्नमंडपात विवाहबद्ध झाले.

यापूर्वी 2019 मध्ये मध्य प्रदेशातही अशीच घटना समोर आली होती. येथे सिरोज शहरातील एका नवरी लग्नाच्या दोन आठवड्यांनंतर पूजाऱ्यासोबत पळाली होती. यादरम्यान नवरीने घरातून 1.5 लाख रुपये आणि 30 हजार रुपयांची कॅश घेऊन पळ काढला होता. तपासानुसार पुजारी आणि नवरी गेल्या 2 वर्षांपासून एकत्र होते.

Published by: Meenal Gangurde
First published: January 7, 2021, 4:44 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या