मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पायावरील अशी लक्षणं असतात घातक आजारांचे संकेत; त्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

पायावरील अशी लक्षणं असतात घातक आजारांचे संकेत; त्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

मधुमेह (Diabetes), थायरॉईड, अॅनिमिया, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

मधुमेह (Diabetes), थायरॉईड, अॅनिमिया, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

मधुमेह (Diabetes), थायरॉईड, अॅनिमिया, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पायावरूनही (Feet) आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे हे ओळखता येऊ शकते. मधुमेह (Diabetes), थायरॉईड, अॅनिमिया, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

सुजलेले पाय

पायांना सूज येणं हे मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराचे किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते. दुसरीकडे, जर पायाच्या वेगवेगळ्या भागात वेदना किंवा सूज दिसली तर ते संधिवात किंवा हृदयाशी संबंधित आजारांमुळे देखील असू शकते. सांधेदुखीमध्येही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. जर पायाच्या बोटावर लाल पट्टे दिसले तर ते हृदयाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.

पायात मुंग्या येणे

पायांना मुंग्या येणं हे उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तातील साखरेचे लक्षण असू शकते. या स्थितीत रक्ताभिसरण बिघडते, त्यामुळे पायात मुंग्या येतात. शरीरात व्हिटॅमिन ई आणि डीच्या कमतरतेमुळे पायांना मुंग्या येऊ शकतात. मधुमेहामुळेही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. मधुमेहामुळेही टाचदुखी होऊ शकते. दुसरीकडे, पायांमध्ये कोरडेपणा थायरॉईड रोगाचे लक्षण असू शकते.

हे वाचा - Shahid Kapoor वर फिदा होती त्याच्याच बायकोची बेस्ट फ्रेंड! काय आहे मीराची प्रतिक्रिया

पायांचा रंग मंदावणे

जर पायांचा रंग बदलत असेल तर ते गॅंग्रीनमुळे असू शकते. हा जीवाणूजन्य आजार शरीरात योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळे होऊ शकतो.

बोटे जाड होणे

पायाची बोटे जाड होणे हे आतड्याच्या आजाराचे लक्षण आहे. हे फुफ्फुसाच्या कर्करोगात आणि हृदयविकारामुळे देखील हे होऊ शकते. जर तुमच्या पायाचे बोट किंवा अंगठा नेहमी दुखत असेल तर ते शरीरात जास्त प्रमाणात प्युरीनचे लक्षण आहे. यामुळे शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी वाढते.

हे वाचा - Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; यूझर्सच्या सुरक्षेसाठी गुगलनं उचललं मोठं पाऊल

पाय दुखणे

जर तुमचा संपूर्ण पाय दुखत असेल तर ते खराब रक्ताभिसरणामुळे असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर संपूर्ण पायात वेदना होतात आणि सांधेदुखीचा त्रासही होतो. याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तरी पाय दुखू शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips