मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /IIT शशांक मिश्रांनी IASसाठी सोडली अमेरिकेची नोकरी; ट्रेन प्रवासात केला अभ्यास

IIT शशांक मिश्रांनी IASसाठी सोडली अमेरिकेची नोकरी; ट्रेन प्रवासात केला अभ्यास

2007 मध्ये शशांक मिश्रा यूपीएससी परीक्षे पास झाले.

2007 मध्ये शशांक मिश्रा यूपीएससी परीक्षे पास झाले.

आयएएस ऑफिसर शशांक मिश्रा (IAS Officer Shashank Misra) यांच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबबदारी त्यांच्यावर पडली. तरीही 12वीत चांगले गुण मिळवून IITला प्रवेश मिळवला.

नवी दिल्ली, 30 जुलै :  आयएएस ऑफिसर शशांक मिश्रा (IAS Officer Shashank Misra) यांना IIT पास झाल्यानंतर अमेरिकेच्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण, 2004 साली त्यांनी नोकरी सोडून सिव्हिल सर्विस परीक्षेची(Civil Service Examination)तयारी सुरू केली. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे. दिल्लीत राहणं शक्य नसल्याने अभ्यासाकरता त्यांना मेरठ ते दिल्ली असा प्रवास ट्रेनने (Train Traveling) करावा लागायचा. मात्र प्रवासातला वेळ देखील त्यांनी अभ्यासासाठी वापरला.

त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) यश मिळवून दाखवलं. 2007 मध्ये शशांक मिश्रा यूपीएससी परीक्षे (UPSC Exam) पास झाले. त्यांनी 5वा रँक मिळवला आणि आर्थिक संकटामध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाला बाहेर काढलं.

(गरीब कुटुंबात जन्मलेले IPS ऑफिसर प्रेमसुख डेलू; 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी)

शशांक मिश्रा लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते. पण, वडिलांच्या निधनानंर त्यांची कौटुंबिक परिस्थिती चांगली राहिली नाही.

बारावीमध्ये असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचे वडील उत्तर प्रदेश मधल्या(Uttar Pradesh)मेरठमध्ये कृषी विभागांमध्ये डेप्युटी कमिशनर पदावर काम करत होते.

(पुरुषांनो! महिलांना माहिती असतं दीर्घायुषी जगण्याचं Secret; या सवयी वय कमी करतात)

त्यांच्या मृत्यूनंतर घराची आणि भावंडांची जबाबदारी शशांक यांच्यावरच पडली. त्याच काळात त्यांनी  बारावीची परिक्षा दिली. बारावी नंतर त्यांनी IIT परीक्षेमध्ये यश मिळवत 137वा रँक मिळवला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मधून इलेक्ट्रिक इंजीनियरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं.

(स्वस्त साबण ठरू शकतो घातक; अंघोळीसाठी साबण की लिक्विड सोप काय आहे उत्तम?)

आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्यांना कॉलेजची फी भरणं देखील कठीण होतं. मात्र या परिस्थितीवर मात करत त्यांनी B.Tech पदवी आणि अमेरिकेमध्ये नोकरी देखील मिळवली. पण, देशासेवा करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांना शांत राहू देत नव्हतं. म्हणूनच 2004 साली नोकरी सोडून त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

First published:
top videos

    Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam