Home /News /lifestyle /

शास्त्रज्ञांच्या चुकीचा आविष्कार! अमेरिकन आणि रशियन माशापासून जन्माला आला नवा मासा

शास्त्रज्ञांच्या चुकीचा आविष्कार! अमेरिकन आणि रशियन माशापासून जन्माला आला नवा मासा

या माशाचं (fish) निम्मं शरीर आईसारखं आहे तर निम्मं वडिलांसारखं आहे.

    बुडापेस्ट, 24 जुलै : संशोधन करत असताना शास्त्रज्ञांकडून काही दुर्घटना, चुका होतात. अशीच चूक हंगेरीतल्या शास्त्रज्ञांकडून झाली. मात्र त्यांच्या या चुकीतून आविष्कार झाला. दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या माशांवर प्रजनन प्रयोग करत असताना झालेल्या एका चुकीतून नव्या प्रजातीच्या माशाची निर्मिती झाली. या माशामध्ये दोन्ही माशांचे गुण आहेत. तो निम्मा आपल्या आईसारखा आणि निम्मा वडिलांसारखा दिसतो. हंगेरीतील (Hungery) रिसर्च इन्स्टिट्युट फॉर फिशरीज अँड एक्वाकल्चरच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला. सायंटिफिक जर्नल जीन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे शास्त्रज्ञ अमेरिकेच्या पॅडलफिश (American paddlefish) आणि रशियाच्या स्टर्जोन (Russian sturgeon) प्रजातींच्या माशांचं संकर प्रजनन झालं आणि नव्या प्रजातीची स्टर्डलफिशची (sturddlefish)  निर्मिती झाली. ज्याची अपेक्षा शास्त्रज्ञांनाही नव्हती. पॅडलफिश आणि स्टर्जोन हे दोन्ही मासे जीवाश्म मासे आहे. त्यांची प्रजाती खूप जुनी आहे आणि त्यांचा विकासही धीमा होत होता.  युनियन ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या मते, या दोन्ही प्रजातीचे मासे सध्या लुप्त होण्याच्या मर्गावर आहेत. हे वाचा - रिल नव्हे तर रिअल रोमँटिक क्षण; तुटत्या ताऱ्यासमोरच तरुणानं केलं प्रपोज सीनेटच्या रिपोर्टनुसार, या दोन माशांचं प्रजनन म्हणजे एक दुर्घटना होती.  म्हणजे या दोन माशांचंं प्रजनन या नव्या प्रजातीच्या माशाच्या निर्मितीच्या हेतूने करण्यात आलं नव्हतं. आपल्याकडून नेमकी काय चूक झाली हे शास्त्रज्ञांना नंतर समजलं. शास्त्रज्ञ जिनोजेनेसिस नावाच्या एका अलैंगिक प्रजनन पद्धतीचा या दोन्ही माशांवर वेगवेगळे प्रयोग करत होते. या प्रक्रियेतेत डीएनएन नसलेल्या शुक्राणूंची गरज असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी पॅडलफिशच्या शुक्राणूंना  चुकीनं स्टर्जोनच्या अंड्यात सोडले हे त्यांनाही समजलं नाही.  विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी चूक केली मात्र त्यातून एक नव्या संकर प्रजातीच्या स्टर्डलफिशची निर्मिती झाली. ज्याचं निम्म शरीर मादी मासा म्हणजे त्याची आई स्टर्जोन आणि निम्म शरीर नर मासा म्हणजे वडील पॅडलफिशसारखं आहे. हे वाचा - OMG! 14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का? या संशोधनाच्या अभ्यासिका एटिला यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं, आम्ही संकरण प्रक्रियेला हातही नाही लावणार होतो मात्र हे सर्व आमच्या नकळत झालं. हा मासा संकरणानंतर खूपच सुंदर दिसतो आहे. मात्र तो पाण्यात दिसेल याची शक्यता खूपच कमी आहे कारण ज्या दोन वेगवेगळ्या माशांपासून या माशाची निर्मिती झाली आहे ते मासे आपसात प्रजनन नाही करत. स्टर्डलफिश अ‍ॅसिपेनसराडे आणि पोल्योजानटाइडे कुटुंबातील सदस्य आहे. मात्र कृत्रिमरित्या संकरण करून निर्माण करण्यात आलेल्या प्रजातींचं प्रजनन होत नाही. त्यामुळे स्टार्डलफिशचंही होणार नाही. असे मासे फक्त प्रयोगशाळेतच निर्माण होऊ शकता. हा मासा शंभर वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. मात्र असे आणखी मासे निर्माण करण्याची योजना नसल्याचंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या