Research- ...म्हणून महिलांना असतो पुरुषांपेक्षा कमी पगार

Research- ...म्हणून महिलांना असतो पुरुषांपेक्षा कमी पगार

स्त्री- पुरुष समानतेबद्दल कितीही बोललं जात असलं तरी आजही भारतात पुरुषांपेक्षा महिलांना कमी मानधन दिलं जातं.

  • Share this:

भारतात आतापर्यंत लिंगभेदाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. लिंगभेदाबद्दल अनेकांनी लिहिलं आणि सहन केलं आहे. स्त्री- पुरुष समानतेबद्दल कितीही बोललं जात असलं तरी आजही भारतात पुरुषांपेक्षा महिलांना कमी मानधन दिलं जातं. एवढंच काय तर महिला पुरुषांपेक्षा अधिक कार्यक्षम असली तरी तिच्या मानधनात प्रचंड तफावत पाहायला मिळते. या सर्वात आता एक रिसर्च समोर आला आहे. यात असं म्हटलं गेलं आहे की, महिला या सॅलरी निगोसिएशन चांगल्या प्रकारे करू शकत नसल्यामुळे त्यांचा पगार कमी असल्याचं म्हटलं गेलं आहे. नव्या संशोधनात म्हटलं गेलं आहे की, महिला आणि पुरुष दोन्ही समान पगाराएवढं काम करतात. पण महिलांच्या पगाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.

काय आहे नवा शोध-

गे संशोधन 'औद्योगिक संबंध- ए जर्नल ऑफ इकोनॉमी अँड सोसायटी' नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झालं आहे. यात म्हटलं गेलं की, सर्वसाधारणपणे महिला या पुरुषांपेक्षा कमी कमावतात. पण यामागे नक्की काय कारण आहे हे अजून कळू शकलेलं नाही. मात्र सॅलरी निगोसिएशनमध्ये महिला मागे पडतात त्यामुळे त्यांचा पगार हा पुरुषांपेक्षा कमी असतो असं म्हटलं जातं. याचा दुसरा अर्थ काढायचा तर महिलांना व्यवहार जमत नाही असंही या संशोधनात म्हटलं आहे. नेमकी याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संशोधनानुसार, पुरुष आणि महिला दोघंही समसमान पगार मागतात. पण महिलांची गोषअट जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जाते.

अखेर महिलांना योग्य पगार का मिळत नाही?

या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोणताही विशिष्ट असा डेटा नाही. मात्र त्यातही एक असं कारण समोर आलं आहे की, जास्त करून महिला अशा नोकरींमध्ये असतात जिथे पगार वाढीची शक्यता कमी असते. एक नव्या संशोधनानुसार, भारतात जवळपास 120 दशलक्ष महिला या असंघटित क्षेत्रात काम करतात. यात शेतीही येते. या क्षेत्रात पगार वाढ होणं हे जवळपास अशक्य असतं. अनेक वर्षांपासून लिंगभेदाची लढाई ही सुरुच आहे. लिंगभेद पूर्णपणे बंद करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र आजही काही अंशी लिंगभेद जगभरात आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल

आज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं!

त्या चार गोष्टी ज्या मुली आपल्या पार्टनरपासून नेहमी लपवतात

ज्यांच्या दातांमध्ये असते फट, ते असतात नशीबवान; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्य

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 22, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या