मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय सांगता? जगभरात कुठेही पावसाचं पाणी पिण्यायोग्य नाही? संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

काय सांगता? जगभरात कुठेही पावसाचं पाणी पिण्यायोग्य नाही? संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

देशातल्या नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे कल वाढावा, यासाठी सातत्यानं जनजागृती केली जाते; पण आता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातल्या नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे कल वाढावा, यासाठी सातत्यानं जनजागृती केली जाते; पण आता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातल्या नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे कल वाढावा, यासाठी सातत्यानं जनजागृती केली जाते; पण आता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरवर्षी पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागतो. जागतिक हवामानबदलामुळे (Climate Change) काही ठिकाणी जास्त पाऊस, तर काही ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण होताना दिसत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला (Rain Water Harvesting) प्राधान्य दिलं जात आहे. या संकल्पनेत पावसाचं पडणारं पाणी साठवून ते पिण्यासाठी, तसंच अन्य कारणांसाठी वापरलं जातं. देशातल्या नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे कल वाढावा, यासाठी सातत्यानं जनजागृती केली जाते; पण आता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात कुठेही आता पावसाचं पाणी शुद्ध (Pure) राहिलेलं नाही. या पाण्यात काही नवीन घातक रसायनं (Chemicals) असल्यानं शारीरिक समस्या वाढू शकतात, असं संशोधकांचं मत आहे. 'आज तक'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक देशात पावसाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. पावसाच्या आगमनामुळे उष्म्यापासून दिलासा मिळतो. त्यामुळे पावसाचे थेंब अंगावर पडताच एक वेगळा आनंद मिळतो; पण याच पावसाच्या थेंबात असणारे विषारी घटक आपल्याला कळत नाहीत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी (Health) नुकसानदायी ठरू शकतात. जगातल्या अनेक ठिकाणी पावसाचं पाणी पिण्यायोग्य मानलं जातं. हे पाणी साठवून पिण्यासाठी वापरलं जातं. काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून पावसाळ्यानंतर काही महिने हे पावसाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. एका नव्या संशोधनानुसार, जगात कुठेही पावसाचं पाणी आता शुद्ध असत नाही. (कोणता साबण किंवा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर? जाहिरातींना बळी पडू नका) माणसांच्या कृत्यांतून वातावरणात सोडल्या गेलेल्या विषारी रसायनांमुळे (Toxic Chemicals) पावसाचं पाणीही अशुद्ध होतं. त्यात आणखी नवीन रसायनं विरघळत आहेत. या रसायनांना फॉरएव्हर केमिकल्स (Forever Chemicals) असं म्हणतात. ही रसायनं आरोग्यासाठी घातक मानली जातात. साधारणपणे या रसायनांचा मोठा भाग मानवनिर्मित रसायनांमध्ये येत नाही; मात्र तरीही ती पावसात मिसळत आहेत. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांना जगातल्या बहुतांश ठिकाणचं पावसाचे पाणी असुरक्षित असल्याचं आढळून आलं आहे. अंटार्क्टिकामध्येही पावसाचं पाणी शुद्ध नाही. पावसाचं पाणी शुद्ध आहे असं पूर्वी समजलं जायचं; पण आता हे पाणी शुद्ध नाही. कारण माणसाने वायू, पाणी, जमीन अशी प्रत्येक गोष्ट प्रदूषित केली आहे. पावसाच्या पाण्यात पर अँड पॉलि-फ्लोरोएल्किल सबस्टन्सेस (Per- and poly-fluoroalkyl substances - PFAS ) मिसळलेले असतात. त्यालाच फॉरेव्हर केमिकल्स असं म्हणतात. फॉरेव्हर केमिकल्स वातावरणात विरघळत नाहीत. ते नॉनस्टिक असतात. या रसायनांमध्ये घाण काढून टाकण्याची क्षमता असते. ती घरगुती पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधनं आणि स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये वापरले जातात. जगभरात फॉरेव्हर केमिकल्सच्या अनुषंगाने विशेष मार्गदर्शक तत्त्वं (Guidelines) आहेत; पण हळूहळू त्यांची पातळी घसरत आहे. गेल्या दोन दशकांत फॉरेव्हर केमिकल्सच्या विषारीपणाबाबत कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आलेली नाहीत. त्यांच्यात कोणाताही नवीन किंवा सकारात्मक बदल झालेला नाही. फॉरेव्हर केमिकल्स शरीरासाठी अपायकारक मानली जातात. शरीरात या रसायनांचं प्रमाण शरीरात वाढल्यास प्रजननक्षमता (Fertility) कमी होते. कॅन्सरचा (Cancer) धोका वाढतो. याशिवाय लहान मुलांच्या विकासावर परिणाम होतो. काही जणांच्या मते या रसायनांमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याबाबत ठोस पुरावे नाहीत. परंतु, नव्या संशोधनाच्या माध्यमातून `पीएफएएस`विषयी नव्या आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. स्टॉकहोम विद्यापीठातल्या डिपार्टमेंट ऑफ एनव्हायर्न्मेंटल सायन्सचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख संशोधक इयान कझिन्स यांनी सांगितलं, `पीएफएएस`च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे या रसायनांचं प्रमाण वाढत आहे. या रसायनांमध्ये कॅन्सर होण्यासाठी पूरक ठरणारे परफ्लोरोऑक्टेनोइक अ‍ॅसिड्स (PFOA) असतात. अमेरिकेत या रसायनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची पातळी 3.75 कोटी वेळा कमी झाली. अमेरिकेनं आता याबाबत नव्याने मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. त्यात पावसाचं पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असं म्हटलं आहे. जगभरात कुठेही पावसाचं पाणी दर्जेदार नाही, असंही नमूद करण्यात आलं आहे, असं इयान यांनी स्पष्ट केलं. झुरिच येथील फूड पॅकेजिंग फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. जेन मन्के यांनी सांगितलं, `पिण्याच्या पाण्यात `पीएफएएस`चं प्रमाण वेगानं वाढत आहे. हे रसायन हवेत मिसळत आहे. यामुळे पावसाचं पाणीही प्रदूषित (Polluted) होत आहे. सध्याच्या शास्त्रीय समजानुसार, हे रसायन वापरणाऱ्या सर्व उद्योगांना त्याचा वापर कमी करावा लागेल. तसंच या रसायनांचं उत्पादन कमी करावं लागेल. कोट्यवधी व्यक्तींचं पिण्याचं पाणी प्रदूषित करून कोणताही नफा कमावता येत नाही. आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांवरही लक्ष ठेवावं लागेल. परंतु, मोठ्या प्रमाणात `पीएफएएस`चं उत्सर्जन होत असून, ते धोकादायक आहे.'
First published:

Tags: Rain

पुढील बातम्या