मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Study : व्हिडीओ गेम्स खेळल्याने मुलांचा मेंदू होतो तीक्ष्ण? काय आहे हे संशोधन?

Study : व्हिडीओ गेम्स खेळल्याने मुलांचा मेंदू होतो तीक्ष्ण? काय आहे हे संशोधन?

किशोरवयातील मेंदू संज्ञानात्मक विकास (ABCD) अभ्यासातील डेटा वापरून हा अभ्यास केला गेला, ज्यामध्ये यूएसमधील 2,217 मुलांच्या मेंदूच्या विकासाचा मागोवा घेण्यात आला. ही अशी मुले आहेत जी 9 ते 10 वर्षे वयात म्हणजेच प्रौढत्वात प्रवेश करत आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : ज्या मुलांची व्हिडिओ गेम खेळतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि त्यांचे त्यांच्या मोटर कौशल्यांवर चांगले नियंत्रण असते. एका नव्या संशोधनानंतर ही माहिती समोर आली आहे. शेवटी, असे आढळून आले आहे की, मुलांच्या मेंदूच्या कार्याशी संबंधित चाचणी कामगिरीमध्ये गेमर अधिक चांगले प्रदर्शन करतात. मात्र, याचे कारण अभ्यासात स्पष्ट करण्यात आलेले नाही.

इतकेच नाही तर या संशोधनातून हेदेखील समोर आले की, व्हिडीओगेम्समुळे मुलांच्या संज्ञानात्मक समस्या दूर करण्यातही मदत होऊ शकते. द व्हर्जमधील लेखानुसार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अ‍ॅब्यूजच्या संचालक नोरा वोल्को यांनी सांगितले की, हा अभ्यास व्हिडिओ गेम खेळणे आणि मेंदूचा विकास यांच्यातील संबंधांबद्दल अधिक माहिती प्रदान करतो.

हाडं कमकुवत झाल्यास करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार करणं ठरेल उपकारक

संशोधन काय आहे

2018 मध्ये यूएस मधील 2,217 मुलांच्या मेंदूच्या विकासाचा मागोवा घेणार्‍या किशोरवयीन मेंदूच्या संज्ञानात्मक विकास (ABCD) अभ्यासातील डेटा वापरून हा अभ्यास केला गेला. ही अशी मुले आहेत जी 9 ते 10 वर्षे वयात म्हणजेच प्रौढत्वात प्रवेश करत आहेत. यामध्ये सहभागींना ब्रेन इमेजिंग, संज्ञानात्मक कार्य, मानसिक आरोग्य तपासणी, शारीरिक आरोग्य तपासणी आणि इतर चाचण्या द्यव्य लागल्या.

संशोधनात काय आढळले

या संशोधनात दोन गट तयार करण्यात आले. एक गट, ज्यामध्ये मुले व्हिडिओ गेमवर आठवड्यातून सुमारे 21 तास घालवतात. तर दुसरा गट, ज्यामध्ये मुले व्हिडिओ गेम खेळत नाहीत. संशोधनात असे आढळून आले की, जी मुले व्हिडिओ गेम खेळत होती, त्यांची मेंदूची स्मरणशक्ती अधिक तीक्ष्ण होते आणि मेंदू अधिक सक्रिय होता. मात्र मानसिक आरोग्यामध्ये दोन्ही गटांमध्ये कोणताही फरक आढळला नाही आणि दोघांच्या मेंदूच्या कार्यामध्ये फरक होण्याचे कारण समजू शकले नाही. या संशोधनात दररोज थोड्या प्रमाणात व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांचा समावेश करण्यात आलेला नाही.

अनेक तास एकाच जागी बसून काम करताय? मग हे एकदा वाचाच

संशोधक काय मानतात

या संशोधनावर न्यूरोडायोलॉजिस्ट कर्क वेलकर म्हणाले, 'या विषयावरील आमच्या ज्ञानात मोठी तफावत आहे.' हे समजू शकले नाही. फक्त काही न्यूरोइमेजिंग अभ्यासांनी या विषयावर काम केले आहे आणि लहान प्रमाणात अभ्यास केला गेला आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health, Parents and child