मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा रिलेशनशीपवर असा होतो परिणाम !

शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा रिलेशनशीपवर असा होतो परिणाम !

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

शाकाहारी (Vegetarian) किंवा विगन व्यक्ती आणि मांसाहारी (Non Vegetarian) व्यक्ती यांना जीवनशैलीत त्यांच्या आहारामुळे बराच फरक पडतो. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 27 डिसेंबर: तुम्ही शाकाहारी (Vegetarian) आहात की मांसाहारी (Non Vegetarian)? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत आहोत कारण, त्याचा थेट परिमाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो. शाकाहारी लोकांच्या आवडीनिवडी, स्वभाव, त्याच्या व्यवहाराची पद्धत याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर आधीच संशोधन करण्यात आलं आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचा त्यांच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो याबद्दल अभ्यास करण्यात आला आहे.

'जर्नल ऑफ सोशल सायकॉलॉजी' यात छापून आलेल्या माहितीनुसार, शाकाहारी लोक साधारणपणे शाकाहारी लोकांशीच मैत्री करणं उचित समजतात. पोलंडचे संशोधक जॉन नेजलेक आणि मार्जेना अमेरिकेचे संशोधक कॅथरीन फॉरेस्टेल यांनी एकत्र येत हे संशोधन केलं आहे. अमेरिकेतील शाकाहारी आणि विगन अर्थात कोणत्याही प्रकारचं मांस न खाणाऱ्या लोकांवर हे संशोधन करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणामध्ये अमेरिकेतील अनेक विगन आणि शाकाहारी व्यक्तींचा सहभाग होता. ज्यात स्त्रिया आणि पुरूष दोघंही होते. वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींवर हा सर्व्हे करण्यात आला. त्यातून त्यांची लाइफस्टाइल आणि आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली की, अमेरिकन लोकांवर केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की शाकाहारी लोक मांसाहारींपेक्षा जास्त चांगली मैत्री निभावतात. अभ्यासात असंही दिसून आलं आहे की शाकाहारी लोकांना मांस न खाणाऱ्या लोकांपेक्षा 12 पट जास्त रोमँटिक जोडीदार निवडणं आवडतं. शाकाहारी आणि विगन लोकांच्या प्रेमजीवनावर संशोधन करणारे आणखी एक संशोधक हल हाराजोग म्हणतात की, बहुतेक शाकाहारी लोकांना शाकाहारी लोकांबरोबर फिरायला आवडतं. त्यामुळे तुमचा पार्टनर निवडताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

First published:

Tags: Lifestyle