S M L

परीक्षेचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आहेत 'हे' 7 उपाय

फेब्रुवारी जवळ येत चालला की परीक्षांचे वेध लागतात. आता प्रीलिम्सही सुरू होतील. त्याबरोबर तणाव, स्ट्रेसही वाढतो. हा तणाव दूर कसा करायचा याचे उपाय आपल्या रुटिनमध्येच असतात. त्याबद्दल सांगतायत काॅन्सिलर वंदना जोशी.

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2019 07:16 AM IST

परीक्षेचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आहेत 'हे' 7 उपाय

मुंबई, 09 जानेवारी : परीक्षा छोटी असो वा मोठी, म्हणजे अगदी शाळेतली परीक्षा असो नाहीतर पदवीची विद्यार्थी परीक्षेच्या आधी स्ट्रेस घेतातच. यातून सुटका करणं अवघड नाही. त्यासाठी आहेत हे उपाय

व्यायाम करणं महत्त्वाचं

खरं तर मेडिटेशन हा चांगला उपाय आहे. पण अनेकांना विशेष करून लहान मुलांना जमणार नाही. मग यासाठी योगा किंवा व्यायाम करावा. अभ्यासाला सारखं बसून रहावं लागतं. मग अशा वेळी व्यायाम केल्यानं शरीरात उर्जा निर्माण होतेच, शिवाय पाॅझिटिव्हिटीही येते.


सूर्यनमस्कार आणि शवासन

व्यायामात सूर्यनमस्कार करावा. त्यानं शरीर-मनाला चांगला व्यायाम होतो. आणि शवासन. त्यानं मन शांत, स्ट्रेस फ्री होतं.

डाएटवर लक्ष द्या

Loading...

परीक्षेच्या सुमारास डाएटवरही लक्ष केंद्रित करावं. आहार नियमित घ्यावा. तो घरीच बनवलेला, चौरस आहार असावा. अनेकदा स्ट्रेसमुळे पोटात बिघाड होतो. म्हणून आहार काळजीपूर्वक आणि वेळेत घ्यावा. जंग फूड टाळावं.

अभ्यासाचं नियोजन करा

आता वळू या अभ्यासाकडे. स्ट्रेस कमी होण्यासाठी अभ्यासाचं नियोजन हवं. नुसतं टाइम टेबल करायचं नाही, तर ते पाळायचंही. स्ट्रेस म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टी तुमच्या आवाक्याबाहेर जातात, तेव्हा स्ट्रेस होतो. टेंशन असणं चांगलं. ते असतंच. पण स्ट्रेस असू नये. टाइम मॅनेजमेंटही खूप महत्त्वाचं असतं.

पाॅझिटिव्ह थिंकिंग करा

स्ट्रेस कमी करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाॅझिटिव्ह थिंकिंग. ते कसं करायचं? विद्यार्थ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावं, आपण जसा विचार करतो तशा रिअॅक्शन्स होत असतात. म्हणजे तुम्ही विचार केलात की आपल्याला हे जमणारच नाही, तर मग नाहीच जमत. पण मी परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो, असाच तुम्ही विचार केलात तर तुम्हाला पेपर सोपा जाईल.

सेल्फ टाॅक करा

पाॅझिटिव्ही थिंकिंग हे आयुष्यात मोलाचं काम करतं. अशा वेळी सेल्फ टाॅक महत्त्वाचा असतो. हे आपल्याला जमेल, असा टाॅक करायचा. सकारात्मक विचार केलात, तर सकारात्मकच घडणार.

पालकांनीही हे लक्षात ठेवा

पालकांनीही या वेळी घरातलं वातावरण चांगलं ठेवावं. पालकांपैकी कुणी तरी एकानं परीक्षेच्या काळात आजूबाजूला रहावं. पालकांनी मुलांवर जास्त प्रेशर देऊ नये. मुलांना सांगावं, तुम्ही तुमचं बेस्ट आहे ते करा. तुमच्या मुलांची कुणाशीही तुलना करू नका. तुमचं मूल आहे तसं स्वीकारा. म्हणजे त्यांचा परीक्षेतला स्ट्रेस कमी नक्की होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 07:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close