मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हाला खोटं वाटेल! पण खरंच.. 'हे' स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी वाईट नाहीत

तुम्हाला खोटं वाटेल! पण खरंच.. 'हे' स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी वाईट नाहीत

जर आम्ही तुम्हाला सांगितलं की काही स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी घातक नाहीत तर? विश्वास बसत नाहीये ना. तर हे खरं आहे. काही स्ट्रीट फूड तुमच्या तोंडाची चव वाढवतात आणि तुमच्या तब्येतीला हानीदेखील पोहोचवत नाहीत.

जर आम्ही तुम्हाला सांगितलं की काही स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी घातक नाहीत तर? विश्वास बसत नाहीये ना. तर हे खरं आहे. काही स्ट्रीट फूड तुमच्या तोंडाची चव वाढवतात आणि तुमच्या तब्येतीला हानीदेखील पोहोचवत नाहीत.

जर आम्ही तुम्हाला सांगितलं की काही स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी घातक नाहीत तर? विश्वास बसत नाहीये ना. तर हे खरं आहे. काही स्ट्रीट फूड तुमच्या तोंडाची चव वाढवतात आणि तुमच्या तब्येतीला हानीदेखील पोहोचवत नाहीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 3 डिसेंबर : स्ट्रीट फूड हा कोणत्याही देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. रस्त्याच्या कडेला विकले जाणारे खाद्यपदार्थ जगभरात सापडतील, जे स्थानिकांमध्ये खूप लोकप्रिय असतात. प्रत्येकजण स्ट्रीट फूडचा शौकीन असतो. आपल्या देशातही स्ट्रीट फूडची मोठी साखळी आहे आणि ती वैविध्यपूर्ण आहे. मात्र चवीला कितीही उत्तम असले तरी स्ट्रीट फूड आपल्या आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसल्याचे मानले जाते.

आरोग्याचा विचार करून खूप बाहेरचे पदार्थ खाणे टाळतात. काही लोक तर कायचे हे पदार्थ खाणे बंद करतात. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की काही स्ट्रीट फूड तुमच्या आरोग्यासाठी घातक नाहीत तर? विश्वास बसत नाहीये ना. तर हे खरं आहे. काही स्ट्रीट फूड तुमच्या तोंडाची चव वाढवतात आणि तुमच्या तब्येतीला हानीदेखील पोहोचवत नाहीत. चला पाहूया ते कोणते पदार्थ आहेत.

मध्यरात्री पोटात कावळे ओरडतात? हे आहेत काही हेल्दी स्नॅक्स तुमच्यासाठी

चाट

E Time ने दिलेल्या माहितीनुसार, चाट हे असे स्ट्रीट फूड आहे, ज्यात अनेक वेगवेगळे पदार्थ असतात आणि ते तितकेच चविष्ट असते. दही, कोरड्या आल्याची पेस्ट, हिरवी चटणी, भाज्या आणि पापडी यासारख्या घटकांच्या मिश्रणाने बनवलेल्या चाटच्या मध्यम सर्व्हिंगमध्ये सुमारे 280 कॅलरीज आहेत, जे जेवण म्हणून कॅलरी कमी असलेल्या आहारात मोडते.

दोसा

दोसा आंबवलेला तांदूळ, डाळ आणि सौम्य मसाल्यांच्या पिठात बनवलेले हेल्दी स्ट्रीट फूड आहे. दोसा सांभार आणि नारळाच्या चटणीसोबत केला जातो. एका साध्या दोश्यामध्ये सुमारे 133 कॅलरीज असतात, त्यामुळे ते एक हेल्दी डाएट बनते.

भेळपुरी

मुरमुरे, भाज्या, चिंचेची लाल चटणी, हिरवी चटणी, लिंबाचा रस आणि काही स्वादिष्ट मसाले घालून बनवलेल्या भेलपुरीचे अनेक चाहते असतात. भेळपुरीच्या एका वाटीत सुमारे 280 कॅलरीज असतात, जे जेवणाच्या बदल्यात निरोगी आहारात मोडतात. या स्ट्रीट फूडमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जास्त असतात.

पाणीपुरी

पाणीपुरी, गोलगप्पा नाव काहीही असो पण चव अप्रतिम. किमान भारतात तरी असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. या साध्या सोप्या स्ट्रीट फूडचे अनेक चाहते आहेत. यामध्ये पिठाच्या फुगवलेल्या पुऱ्या, तिखट आणि गोड पाणी, चिंचेची चटणी, हिरवी चटणी आणि बटाटे किंवा चण्याचे सारण असते. रव्यापासून बनवलेल्या या पुऱ्या आरोग्यास कोणतीही हानी पोचवत नाही. एका पाणीपुरीमध्ये सुमारे 36 कॅलरीज असतात, ज्यामुळे ते स्ट्रीट फूड स्वादिष्ट पदार्थ बनते.

Right Time To Eat Curd : दही खाण्याची योग्य वेळ कोणती, जेवणापूर्वी की जेवणानंतर?

झालमुरी

झालमुरी हा एक पारंपारिक बंगाली पदार्थ आहे. मुरमुरे, काकडी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे, उकडलेले छोटे बटाटे, थोडे तेल, मसाले आणि औषधी वनस्पती हे सर्व मिसळून झालमुरी बनवली जाते. या स्ट्रीट फूडमध्ये सुमारे 190-200 कॅलरीज असतात, ज्यामुळे ते हेल्दी बनते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle