Home /News /lifestyle /

पावसाळ्यात या पद्धतीने साठवा तुमचे आवडते स्नॅक्स, ओले होणार नाहीत आणि दीर्घकाळ टिकतील

पावसाळ्यात या पद्धतीने साठवा तुमचे आवडते स्नॅक्स, ओले होणार नाहीत आणि दीर्घकाळ टिकतील

पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage In Monsoon) योग्य पद्धतीने साठवणे एक आव्हान असते. सहसा पावसाळ्याच्या दिवसात हवामानामुळे अन्नपदार्थ ओलसर होतात आणि मूळ चव देखील गमावतात.

    मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage In Monsoon) योग्य पद्धतीने साठवणे एक आव्हान असते. सहसा पावसाळ्याच्या दिवसात हवेतील उच्च आर्द्रता (Humidity) म्हणजेच ओलावा स्नॅक्स, कुकीज, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या शेल्फ लाइफवर (Food Shelf Life) परिणाम करतो. हवामानामुळे अन्नपदार्थ ओलसर होतात आणि मूळ चव देखील गमावतात. पावसाळ्यात खाद्यपदार्थ, विशेषत: स्नॅक्स दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स.. ओलसर ठिकाणे टाळा स्वयंपाकघरात किंवा घरात कुठेही ओलसर जागा असेल (Avoid Wet Areas) त्या ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवल्यास बुरशीचा धोका वाढतो. ओलावा असलेली ठिकाणे ही बुरशी आणि जंतूंच्या वाढीसाठी आदर्श स्थिती आहे. म्हणून बुरशीची वाढ टाळण्यासाठी अन्न किंवा स्नॅक्स ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवा. ते व्यवस्थित पॅक करून रॅकमध्ये ठेवा.

    अहो खरंच! आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं?

    ग्लास जार वापरा जेव्हा स्नॅक्स पॅकेटमध्ये साठवले जातात तेव्हा ते ओलावा आणि आर्द्रतेमुळे ओले होण्याची अधिक शक्यता असते. त्यांना घट्ट असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवणे (Use Glass Jar) हा एक चांगला पर्याय असू शकतो. हवाबंद काचेच्या भांड्यात अन्नपदार्थ साठवल्याने त्यांची शेल्फ लाइफ वाढते. सूर्यप्रकाशात धान्य वाळवणे टाळा पावसाळ्यात फराळाचे पदार्थ किंवा खाद्यपदार्थ जास्त काळ सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा. यामुळे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अन्नपदार्थांचा सूर्यप्रकाशाशी होणारा संपर्क कमी करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार! वेगवेगळे पदार्थ एकत्र ठेऊ नये पावसाळ्यात काचेच्या बरणीत वेगवेगळे स्नॅक्स एकत्र (Avoid Mixing Snacks) साठवणे टाळावे. काचेच्या भांड्यात स्नॅक्स व्यवस्थित पॅक करा आणि नंतर ते साठवा. स्नॅक्समधील मीठ आणि साखरेचे प्रमाण पावसाळ्यात ओलाव्यामुळे ओलसर बनवते. त्यामुळे वेगवेगळे अन्नपदार्थ वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवणे चांगले.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Monsoon

    पुढील बातम्या