• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कपडे धुताना तुम्हीसुद्धा अशी चूक करत नाहीत ना? डिटर्जंट कंपन्यांच्या संशोधनातून माहिती आली समोर

कपडे धुताना तुम्हीसुद्धा अशी चूक करत नाहीत ना? डिटर्जंट कंपन्यांच्या संशोधनातून माहिती आली समोर

कपड्यांमधील घाण आणि डाग स्वच्छपणे काढून टाकण्यासाठी ठराविक प्रमाणातच डिटर्जंटची गरज असते. परंतु, आपण प्रमाणापेक्षा जास्त डिटर्जंट वापरत असाल तर त्यामुळं कपड्यांच्या वेगळ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये किंवा हातानं कपडे धुताना जास्त डिटर्जंट (detergent powder) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कपड्यांमधील घाण आणि डाग स्वच्छपणे काढून टाकण्यासाठी ठराविक प्रमाणातच डिटर्जंटची गरज असते. परंतु, आपण प्रमाणापेक्षा जास्त डिटर्जंट वापरत असाल तर त्यामुळं कपड्यांच्या वेगळ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. संशोधनातून माहिती आली समोर लोकांना वाटतं की डिटर्जंट पावडर (detergent powder) पाण्यात पूर्णपणे विरघळते पण असे होत नाही. त्याचे काही कण कपड्यांना चिकटलेले असतात. त्याचा तुमच्या कपड्यांवरही परिणाम होतो. लाँड्रीमधून आल्यानंतर काही कपडे चिकटलेली असल्याचे आपल्याला दिसते, हे चिकटण्याचे कारण जास्त डिटर्जंटचा वापर असू शकते. संशोधनानुसार, यामुळे कपड्यांचे वजनही वाढते. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, डिटर्जंट ब्रँड टाइडचा अहवाल देखील असेच सांगतो की, जास्त डिटर्जंट वापरणे योग्य नाही. कंपनीचा अहवाल असेही म्हणतो की तुम्ही जितके डिटर्जंट वापरता तेवढे ते कापड जास्त खराब होण्याची शक्यता असते. डिटर्जंट किती वापरावे? डिटर्जंट कंपनीच्या स्टडी रिपोर्टच्या लेखिका सारा आणि तिचे वरिष्ठ लियाम यांच्या मते, कपडे व्यवस्थित धुण्यासाठी तुम्हाला एका वेळी फक्त 2 चमचे डिटर्जंटची गरज आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या 6Kg क्षमतेच्या वॉशिंग मशिनमध्ये सुमारे 12 पौंड वजनाचे कपडे म्हणजे सुमारे 5.5 किलो वजनाचे कपडे ठेवले तर त्यांच्या चांगल्या धुण्यासाठी फक्त 2 चमचे डिटर्जंट पुरेसे आहे. जर कपड्यांचे वजन आठ पौंडपेक्षा कमी असेल तर फक्त 1 चमचे डिटर्जंट घालावे. हे वाचा - संतापजनक! अभिनेत्रीला पाठवले अंडरगार्मेंट्स आणि Sex Toys, विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण संशोधकांच्या मते, 'काही ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये किती पावडर वापरावी याचा उल्लेख करतात. काहीवेळा ते 2 चमच्यापेक्षा जास्तही वापरण्याची शिफारस करतात. खरं तर दोन चमचे पुरेसे प्रमाण आहे. ते जास्तीची पावडर वापरण्यास सांगण्याचे कारण म्हणजे, शेवटी ती एक कंपनी आहे आणि त्यांना त्याचे उत्पादन प्रत्येक ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करावे अशी इच्छा असते. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जरी तुम्ही उच्च कार्यक्षमता (HE) डिटर्जंट वापरत असाल, तरी तुम्ही ठराविक पावडरची मर्यादा ओलांडू नये. हे वाचा - TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात कधीच ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही; असं का? वाचा जुन्या भारतीय पद्धतीची शिफारस यावर लिकवीड डिटर्जंटचा वापर करणे हा एक चांगला उपाय आहे, ते पाण्यात सहज पातळ होते. व्हर्लपूल कंपनीने व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात जास्त घाण झालेली कपडे धुण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी, दोन चमचे डिटर्जंट पिळून घेण्याऐवजी, प्रथम बादलीत 1 चतुर्थांश पाणी भरा आणि त्यात एक कप व्हिनेगर घाला, नंतर त्यात घाणेरडे कपडे बुडवा. काही काळानंतर, जर कोणताही डाग खूप खोल असेल तर त्याला थोडे द्रव डिटर्जंटने घासून घ्या आणि नंतर सामान्य प्रमाणात डिटर्जंट वापरून वॉशिंग मशीन चालू करा.
  Published by:News18 Desk
  First published: