तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा

भारतीय लोकांचा आरोग्यापेक्षा चवीच्या पदार्थांकडे जास्त कल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या स्वादिष्ट खाण्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतोय.

  • Share this:

24 मार्च : भारतीय संस्कृतीचे खाद्यपदार्थ फार स्वादिष्ट असतात, त्यामुळेच कदाचित भारतीय लोकांचा आरोग्यापेक्षा चवीच्या पदार्थांकडे जास्त कल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या स्वादिष्ट खाण्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष करतोय.

दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा जास्तीचे मीठ आपल्या आहारात असू नये, आणि साखरेचे प्रमाण दोनपेक्षा आधिक असेल तर ते आपल्या आरोग्यास हानीकार ठरु शकतं.

रोजच्या आहारात तेलाचे प्रमाणसुद्धा 2 छोट्या चमच्यापेक्षा अधिक असता कामा नये. पण आपल्या भारतीय खाद्यपदार्थात मात्र यापैकी कोणत्याच गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत.

निरोगी राहणे आणि लठ्ठपणा कमी करणे या दोन्ही गोष्टी करणं अवघड आहे. निरोगी राहण्याकरीता आपल्याला आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. ज्यामधे जंक फूड पूर्णत: बंद करणे जरुरीचे आहे आणि फक्त हेल्दी डाइट आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात साखर, मीठ आणि तेल या तीन गोष्टींचा कमी प्रमाणात वापर केलात तर तुम्ही लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह आणि हृदयविकार अशाप्रकारचे आजार होण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता.

बदलेली जीवनशैली, आहार, नियमित व्यायाम न करणे ही या सर्व समस्यांची कारणे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी रहा. अर्थात मस्त खा आणि स्वस्त रहा.

First published: March 24, 2018, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading