जगातील सर्वात भयंकर मासा! फक्त एक थेंब विषानेच घेऊ शकतो कित्येकांचा जीव

जगातील सर्वात भयंकर मासा! फक्त एक थेंब विषानेच घेऊ शकतो कित्येकांचा जीव

हा मासा नव्हे तर दगड आहे, असं पाहता क्षणी तुम्हालाही वाटेल. मात्र त्याचा फोटो नीट पाहा.

  • Share this:

मुंबई, 20 जून : सध्या जगभरात कोरोनाव्हायरस अनेकांचा जीव घेतो आहे. मात्र तुम्हाला माहिती नसेल समुद्रात एक जीव असा आहे, जो आपल्या विषाच्या फक्त एका थेंबाने संपूर्ण एक शहर उद्ध्वस्त करू शकतो आणि हा जीव म्हणजे स्टोन फिश (Stone fish). इंडो-पॅसिफिक समुद्रात हा मासा सापडतो.

जवळपास 40 सेंटीमीटर लांब आणि 2 किलो वजन असलेला हा मासा.  धूसर रंगाचा असलेला हा मासा अगदी एखाद्या दगडासारखाच दिसतो. त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी तो सामान्यपणे दगडांमध्ये लपून राहतो, जेणेकरून तो पटकन कुणाच्या नजरेत पडणार नाही. हा मासा धीम्या गतीने पोहतो मात्र शिकार अवघ्या 15 सेकंदात करतो. या माशाची शिकार करण्याची पद्धत आणि त्याच विष हेच त्याचं वैशिष्ट्य.

(Photo-pixabay)

(Photo-pixabay)

दगडासारख्या दिसणारा हा मासा इतर छोट्या माशांना सहसा दिसून येत नाही. जेव्हा एखादा मासा वनस्पती खाण्यासाठी दगडाजवळ येतो तेव्हा स्टोन फिश त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याच्यामध्ये आपलं विष टाकतो. हे विष तो तोंडामार्फत सोडत नाही तर पोहोण्यासाठी मदत करणाऱ्या कल्ल्यांमार्फत सोडतो.

हे वाचा - नदीतून वर आलं लुप्त झालेलं पुरातन मंदिर; महानदीत सापडला 500 वर्षांपूर्वीचा वारसा

फक्त समुद्री जीवच नाही तर माणसांसाठीदेखील हा मासा जीवघेणा ठरू शकतो. आपल्याला धोका दिसताच  हा मासा त्वरित आपलं विष पाण्यात सोडतो. ज्यामुळे काही सेकंदातच कुणीतरी चावल्यानंतर जशा वेदना आणि जळजळ होते, तशीच लक्षणं दिसू लागतात. त्याठिकाणी सूज येते आणि ही सूज पूर्ण शरीरावर दिसू लागते. शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

(Photo-pixabay)

(Photo-pixabay)

माशाच्या विषापासून वाचण्यासाठी अँटिडॉट द्यावं लागतं. त्यामुळेच 1950 साली अँटि वेनम तयार करण्यात आलं. ज्या समुद्रात स्टोन फिश असण्याची शक्यता आहे, तिथल्या पाणबुडे अँटि वेनमसह जाता. मात्र या माशाला आपल्यावर संकट असल्याचं दिसताच तो इतक्या वेगाने विष सोडतो की अनेक जण त्यासाठी तयार नसतात आणि त्यांचा मृत्यू होतो.

हे वाचा - OMG! अंड्यावर अंडी; तरुणाने ही कमाल केली तरी कशी पाहा VIDEO

असंही मानलं जातं की, जर या माशाचं एक थेंब विषही पाण्यात टाकलं जिथून माणसांना पाणीपुरवठा होतो, तर ते पाणी इतकं विषमय होतं की औषध न मिळाल्यास हजारो जीव जाऊ शकतात. यावरू तो किती घातक आहे याचा अंदाज येतोच.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - अजब आंदोलन! जिम सुरू करण्यासाठी चक्क कपडे काढून रस्त्यावर उतरले तरुण आणि...

First published: June 20, 2020, 12:20 PM IST

ताज्या बातम्या