मुंबई, 31 जानेवारी : आजच्या युगात प्रत्येकजण शहरांकडे धावत आहे. शहरातील जीवनाचे आकर्षण प्रत्येकालाच वाटते. शहरांमध्ये आता बहुतांश ठिकाणी मोठ्या इमारती दिसतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शहरांचे हे झगमगते जीवन मानसिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. इथली गजबज तुम्हाला मानसिक रुग्ण बनवू शकते.
दुसरीकडे जे लोक निसर्गाच्या सानिध्यात असतात, त्यांचे मानसिक आरोग्य शहरी लोकांपेक्षा चांगले असते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज 60 मिनिटे नैसर्गिक ठिकाणी चालल्याने मानसिक आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारते आणि तणाव कमी होतो. अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Green Tea Side Effect : 'या' वेळेला चुकूनही पिऊ नका ग्रीन टी; फायद्यांऐवजी नुकसानच होईल जास्त
शहरांमध्ये मानसिक समस्या अधिक आहेत का?
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात राहणार्या लोकांना मानसिक आजार आणि विकार होण्याची अधिक शक्यता असल्याचे आतापर्यंतच्या अनेक अभ्यासातून समोर आले आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, शहरातील लोक निसर्गापासून दूर गेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. जे लोक निसर्गाच्या जवळ राहतात त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असते.
आपल्या पर्यावरणाचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. इतर संशोधनात असे समोर आले आहे की शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या अमिग्डाला क्षेत्रातील क्रिया वाढते. या भागातून मेंदू भावना, भीती आणि तणाव यांचे नियमन करतो. या भागाची क्रियाशीलता वाढल्याने मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.
एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे
जंगलात किंवा इतर नैसर्गिक ठिकाणी 60 मिनिटे चालल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते, असे अलीकडील अभ्यासातून समोर आले आहे. संशोधकांनी या अभ्यासात सहभागी असलेल्या काही लोकांना जंगलात फिरायला पाठवले, तर काही लोकांना शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर पाठवले. त्याच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, जे लोक निसर्गाभोवती फिरत होते. त्यांच्या तणावाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली.
तर शहरांमध्ये फिरणाऱ्या लोकांच्या तणावाच्या पातळीत कोणताही बदल झाला नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की नैसर्गिक गोष्टी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि तणाव कमी करण्यासाठी त्या प्रभावी ठरू शकतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Mental health