तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? हे नक्की वाचा

तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? हे नक्की वाचा

दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतः वर प्रेम करायला शिका.

  • Share this:

मुंबई, 25 जून :आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वास असणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे स्वत:वर प्रेम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. माणसाला त्याच्या वस्तू, आवडी-निवडी, खाणं, कपडे यावर प्रेम असतं. पण, अनेकदा स्वतः वर प्रेम करायला आपण कित्येकदा विसरतो. बऱ्याचवेळा व्यक्ती स्वतःला कमी लेखतात. संपूर्ण जगानंही तुमच्यावर प्रेम करावं, कौतुक करावं अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे. संत कबीर दास यांनी असे सांगितलं आहे की, “कस्तुरी कुंडल बसै,मृग ढूढ़ै वन माहि, ऐसे घट घट राम हैं,दुनिया देखे नाहि” म्हणजे 'ज्याप्रमाणे हरीण त्याच्या बेंबीमध्ये असणाऱ्या कस्तुरीचा शोध संपूर्ण जंगलात घेत असते पण कधी स्वतःमध्ये पाहण्याचाही प्रयत्न करत नाही. त्याचप्रमाणे, माणसांचंहआहे. आपण दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करताना, पण स्वतः वर प्रेम करत नाही.

स्वतःवर प्रेम करायला शिका...

(वाचाः घर सजवताय? मग करा हे काही छोटे बदल आणि तुमचं घर होईल ट्रेंडी)

-स्वतः ला वेळ द्या. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून, गर्दीतून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुढील आव्हानं, संघर्ष आणि भविष्यातील आराखडा याविषयी नियोजन करावे. आत्मचिंतन केल्याने समस्यांना उत्तर देण्याची एक वेगळी दिशा मिळते. विश्वास आत्मसात करण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या.

-जसं तुम्ही स्वतःवर जास्त प्रेम आणि विश्वास करायला शिकाल तस-तसे जीवनात सकारात्मकता येईल. गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलू शकेल.

- स्वतःवर प्रेम केल्यास तर तुमच्यात दया, संवेदनशीलता अशा भावना निर्माण होतील. तुम्ही दुसऱ्यांचे दुःख अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता आणि दुसऱ्यांच्या सुखात सहभागी होण्याची भावना तुमच्यातील नकारात्मकता नष्ट करेल.

(वाचाः हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच)

- तुम्ही जसे आहात तसेच राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार स्वतःला बदलू नका. स्वतःमधील उणिवा स्वीकारा. आपल्याविषयी जे लोक चांगला विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर रहा आणि शक्यतो लक्ष देणे टाळा.

VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव

First published: June 25, 2019, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading