Home /News /lifestyle /

Health Tips : दिवसाची सुरुवात करा कडधान्य खाऊन, संपूर्ण पोषणासह त्वचेसही होतो फायदा

Health Tips : दिवसाची सुरुवात करा कडधान्य खाऊन, संपूर्ण पोषणासह त्वचेसही होतो फायदा

नाश्त्यासाठी फायदेशीर असणारे अनेक पदार्थ आहेत, परंतु स्प्राउट्स (Sprouts) म्हणजेच मोड आलेली कडधान्ये हा एक उत्तम पर्याय असू शकतो. स्प्राउट्सचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  मुंबई, 6 जुलै : नाश्ता (Breakfast) हा दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार असतो. पुरेशी जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे मिळविण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी अन्न पदार्थांनी करणे महत्वाचे आहे. नाश्त्यासाठी फायदेशीर असणारे अनेक पदार्थ आहेत, परंतु स्प्राउट्स (Sprouts) म्हणजेच मोड आलेली कडधान्ये हा एक उत्तम पर्याय असू शकतो. स्प्राउट्स आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर (Sprouts Benefits) आहेत याबद्दल आपण बरेच वाचले आणि ऐकले आहे. आहारतज्ञ सुमन टिब्रेवाला (Dietitian Suman Tibrewala) यांनी नुकत्याच एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्प्राउट्सचा नाश्ता घेतल्यास त्याचे आरोग्याला कोणकोणते फायदे (Sprouts Health Benefits) होतात हे सांगितले आहे. टिब्रेवाला यांनी स्प्राउट्सच्या पौष्टिक मूल्याशी संबंधित माहितीसह एक एक फोटो शेअर केला आहे. “स्प्राउट्सला पोषणाचे पॉवरहाऊस म्हटले जाते. कारण स्प्राउट्समध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. अंकुर फुटल्याने या पोषक तत्वांची जैवउपलब्धताही वाढते,” असे मुंबईस्थित आहारतज्ञांनी लिहिले.

  Delicious Chakli Recipe : एकदा करून तर बघा खमंग आणि कुरकुरीत चकली! चव लक्षातच राहणार 100 टक्के पाणी सुटणार, चॅलेंज आहे आपलं

  टिब्रेवाला यांच्या मते, स्प्राउट्स अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत देखील आहेत आणि मुक्त रॅडिकल्सला कमी करण्यात मदत करतात. “स्प्राउट्समध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म देखील असतात. स्प्राउट्समधील आवश्यक फॅटी ऍसिडचे प्रमाणदेखील मोड आल्यानंतर आणखी वाढते,” टिब्रेवाला यांनी पुढे सांगितले.
  नाश्त्यामध्ये स्प्राउट्स खाण्याचे इतर फायदे (Sprouts Benefits In Breakfast) - स्प्राउट्सचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. - स्प्राउट्स खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारली जाऊ शकते. हे प्रीबायोटिक म्हणून काम करते आणि आतड्यांचे आरोग्य पोषण करते. - असंख्य संशोधन निष्कर्षांनुसार, स्प्राउट्सचे सेवन केल्याने मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते.  Monsoon Recipe: पावसाळ्यात ट्राय करा भाताची भजी, पाहा झटपट रेसिपी इतर भाज्यांप्रमाणेच स्प्राउट्सचेही तोटे आहेत. स्प्राउट्स सामान्यत: हलके शिजवलेले किंवा कच्चे खाल्ले जातात. इतर खाद्यपदार्थांपेक्षा स्प्राउट्स दूषित होण्याची शक्यता जास्त असते. बियाणे उगवण्यासाठी आवश्यक असलेली उबदार, ओलसर परिस्थितीदेखील हानिकारक जंतूंच्या वाढीसाठी आदर्श आहे. त्यामुळे याचे सेवन करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. स्प्राऊट्स खाण्यापूर्वी ते व्यवस्थित धुवून घ्यावे आणि शक्य असल्यास थोडे परतून किंवा गरम करून खावे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या